लाईफस्टाईल

How To Remove Tanning: घरच्या घरी टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा 'या' भाज्या, जाणून घ्या त्यांचा उपयोग

Remove Tanning: हात, पाय आणि चेहऱ्यावरील टॅनिंगमुळे त्रस्त आहात? स्वस्त आणि सहज उपलब्ध भाज्यांचा वापर करून या समस्येवर घरगुती उपाय शोधा आणि टॅनिंगपासून मुक्तता मिळवा.

Dhanshri Shintre

हवामान बदलासोबत कडक उन्हामुळे अनेकांना त्रास होत आहे, आणि त्वचा टॅन होण्याची समस्या सामान्य झाली आहे. उन्हामुळे त्वचा निस्तेज दिसू लागल्यास काळजी करू नका. आम्ही तुम्हाला टॅनिंग दूर करण्याचे काही घरगुती उपाय सुचवतो. महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही; यासाठी स्वस्त आणि सहज उपलब्ध भाज्यांचा उपयोग करू शकता. भाज्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होते. या सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही उन्हाळ्यातही ताजी आणि चमकदार त्वचा राखू शकता.

बटाटा

हे कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण बटाट्याचा रस त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. फक्त बटाट्याचा रस त्वचेवर लावा आणि टॅनिंग हलके करा. बटाट्याच्या रसातील नैसर्गिक ब्लीचिंग घटक टॅनिंग कमी करतात. बटाट्याचा रस काढून हात-पायांवर लावा, अर्ध्या तासानंतर धुवा आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळवा.

टोमॅटो

सध्या टोमॅटो स्वस्त मिळत असल्याने टॅनिंग दूर करण्यासाठी त्यांचा उपयोग करा. टोमॅटोतील लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स टॅनिंग कमी करण्यात मदत करतात, त्वचेला नैसर्गिक चमक देतात. टोमॅटोचा लगदा त्वचेवर लावून टॅनिंग कमी करू शकता. फक्त लगदा लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर त्वचा स्वच्छ धुवा.

काकडी

काकडी त्वचेसाठी थंडावा देऊन जळजळ कमी करते. काकडीचा रस काढा किंवा तुकडे करून टॅनिंग झालेल्या भागांवर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट होऊन टॅनिंग हलके होते आणि जळजळही कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT