UIDAI Alert Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhaar Card Update : सावधान ! UIDAI ने केले अलर्ट, तुम्हीही WhatsApp आणि Gmail वरून आधार कार्ड शेअर करता? वाचा सविस्तर

UIDAI Alert : जर कोणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलद्वारे शेअर करण्यास सांगितले, तर तुम्ही ते विचार न करता आरामात शेअर करता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aadhaar Details Sharing From Whatsapp And Gmail : जर कोणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलद्वारे शेअर करण्यास सांगितले, तर तुम्ही ते विचार न करता आरामात शेअर करता. पण तुम्हाला असे करणे अडचणीत आणू शकते. होय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI कडून असा इशारा देण्यात आला आहे.

प्रत्यक्षात आधार घोटाळ्याचा नवा प्रकार समोर आला आहे. यामध्ये यूजर्सना आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप किंवा जीमेल सारख्या ऑनलाइन मोडद्वारे वापरकर्त्यांकडून आधार कार्डचे (Aadhaar Card) तपशील मागवले जातात. जे लोक सहज शेअर करतात. पण असे करणे सुरक्षित नाही. येथूनच फसवणूक सुरू होते.

अशा प्रकारची फसवणूक समोर आल्यावर UIDAI चेतावणी देते , UIDAI द्वारे हे स्पष्ट करण्यात आले की ते आधार अपडेटच्या (Update) नावाने वापरकर्त्यांना Gmail किंवा WhatsApp वरून कधीही आधार किंवा इतर तपशील विचारत नाही.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, सर्व कागदपत्रे त्याच वेबसाइटवर टाकावी लागतील. यासाठी वेगळे व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेल नाही. याशिवाय वापरकर्ते थेट आधार केंद्रावरून आधार अपडेट करू शकतात.

  • सर्व प्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (Website) https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

  • त्यानंतर तुमच्या अधिकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

  • यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून व्हेरिफिकेशन करावे लागेल.

  • त्यानंतर कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत खालील ड्रॉप डाउन मेनूमध्ये अपलोड करावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल.

  • या क्रमांकावरून तुम्ही आधार अपडेटची माहिती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT