TYPE-2 DIABETES ON THE RISE AMONG YOUTH UNDER 35 saam tv
लाईफस्टाईल

Health Tips : ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढला; चुकीची जीवनशैली आणि आहार ठरतोय कारणीभूत

type-2 diabetes in youth : ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये टाइप-२ मधुमेह झपाट्याने वाढतोय, ज्याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार आहे. वेळीच सवयी न बदलल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Saam Tv

मधुमेह हा आजार पूर्वी प्रामुख्याने चाळिशीनंतर होणारा आजार मानला जात होता. मात्र, बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आता ३५ वर्षांखालील तरुणांमध्येही टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढत आहे. याबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून, वेळीच जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे.

तज्ञांच्या मते, मधूमेह वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली. नियमित व्यायामाचा अभाव, दिवसभर बसून काम करणे, फास्ट फूड, जंक फूड आणि गोड पेयांचे अतिसेवन यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. परिणामी, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होतो.

मधुमेह होण्यामागे चुकीच्या जीवनशैलीसोबतच आनुवंशिक कारणांचाही मोठा वाटा असतो. कुटुंबात आई-वडील किंवा जवळच्या नातेवाइकांना मधुमेह असल्यास तरुणांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पोटाभोवती वाढणारी चरबी, लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो.

मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत?

सुरुवातीला लक्षणे सहज ओळखता येत नाहीत. तथापि, वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, अचानक वजन कमी होणे आणि अंधुक दिसणे ही प्रमुख लक्षणे असू शकतात.

मधुमेह टाळण्यासाठी काय करावे?

  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा चालण्याची सवय लावा.

  • जंक फूड आणि साखरयुक्त पेये टाळा.

  • आहारात भाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश करा.

  • वजन आणि पोटाभोवतीची चरबी नियंत्रणात ठेवा.

  • पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा.

  • नियमित रक्तातील साखरेची तपासणी करा.

डॉक्टरांच्या मते, मधुमेहाची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नये. वेळीच तपासणी आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेहाचा धोका कमी करण्यास किंवा त्याला विलंब लावण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी पाणी शिंपडल्याने काय होते?

Diabetes Diet : मधुमेह झाला म्हणून भात-पोळी सोडताय? ही चूक करू नका; योग्य आहाराने ठेवा साखर नियंत्रणात

SCROLL FOR NEXT