सुट्टीसाठी परफेक्ट लूक! साराच्या स्टायलिश ड्रेसेसने मिळवा ट्रेंडी लूक saratendulkar
लाईफस्टाईल

Vacation Look: सुट्टीसाठी परफेक्ट लूक! साराच्या स्टायलिश ड्रेसेसने मिळवा ट्रेंडी लूक

Travel Style: सारा तेंडुलकरचे ड्रेसिंग तुम्हाला सुट्टीत फक्त स्टायलिश लूकच देणार नाही, तर तुम्हाला आरामदायी ही वाटतील. मग ते समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण असो किंवा हिरवेगार ठिकाण. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक लूक तुम्ही फॉलो करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सारा तेंडुलकरचे स्टायलिश आणि आरामदायक सुट्टीचे लूक

सुट्टीसाठी, तुम्ही सारा तेंडुलकर सारखा पफी स्लीव्हज असलेला हाय स्लिट ड्रेस निवडू शकता, ज्यामध्ये साधा प्रिंट किंवा फ्लोरल प्रिंट असू शकतो. कोणत्याही हिरव्यागार ठिकाणी किंवा समुद्रकिनाऱ्यासाठी या प्रकारचा ड्रेस उत्तम पर्याय आहे.

सारा तेंडुलकरचे फॅशन टिप्स: आरामदायक आणि ट्रेंडी लूक

जर समुद्रकिनाऱ्यावर जाणे तुमच्या सुट्टीच्या यादीत असेल, तर तुम्ही सारा तेंडुलकरसारखा लांब स्ट्रॅपी ड्रेस घालू शकता. त्यासोबत कमीत कमी दागिने घाला. या प्रकारचे कपडे देखील पिक्चर परफेक्ट आहेत. साराने मेंदी हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

सारा तेंडुलकरचे लूक फॉलो करा

सुट्टीत खरेदी करायला जात असाल किंवा आजूबाजूच्या ठिकाणी फिरताना, अगदी आरामदायी लूक हवा असतो. यासाठी तुम्ही सारा तेंडुलकर सारखा डेनिम आउटफिट कॅरी करू शकता. साराने निळ्या रंगाच्या रुंद जीन्ससोबत मॅचिंग टॉप घातला आहे.

सुट्टीसाठी सारा तेंडुलकरचे परफेक्ट आउटफिट्स

सारा तेंडुलकरने घातलेला हा लाल फ्लायर ड्रेस तुम्हीजर समुद्रकिनारी सुट्टीसाठी जात असाल तर एक उत्तम लूक देईल. या डिझाइन आणि रंगाचा ड्रेस तुम्हाला फोटो काढण्यासाठीही सुंदर लूक देईल. हलका मेकअप तुमच्या स्टाईलमध्ये भर घालेल.

सुट्टीसाठी सारा तेंडुलकरचे परफेक्ट आउटफिट्स ट्राय करा

जर तुम्हाला स्टायलिश, क्लासी आणि ग्रेसफुल लूक हवा असेल तर तुमच्या सुट्टीत सारा तेंडुलकरचा हा कॅज्युअल लूक पुन्हा ट्राय करा. साराने काळ्या रंगाचा टॉप, बेज रंगाचा बेल बॉटम पँट आणि काळे बूट घातले आहेत. तुम्ही ही अशा प्रकारे वेगवेगळे आऊटफिट ट्राय करून तुमचा लुक तयार करू शकता.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitrupaksha And Crow Importance: पितृपक्षात कावळ्याला अन्न का दिले जाते? कावळ्याचे एवढे महत्व का? समजून घ्या

Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' २ मिनिटात तयार होणारी पेस्ट

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT