Dhanteras Rahu Kaal saam tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2024: आज धनत्रयोदशीच्या दिवशी राहू काळाचं सावट; 'या' वेळेवर चुकूनही खरेदी करू नका

Dhanteras 2024: संपूर्ण देशभरात धनत्रयोदशीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जर तुम्ही या दिवशी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर राहु काळाची वेळ नक्कीच लक्षात ठेवा.

Surabhi Jayashree Jagdish

आज धनत्रयोदशी असून दिवाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात धनत्रयोदशीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धनत्रोदशी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी. 'धन' म्हणजे संपत्ती आणि 'तेरस' म्हणजे तेरावा दिवस.

दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, भांडी तसंच नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. यंदा धनत्रयोदशीला राहूच्या काळ आहे. या काळात कोणतीही खरेदी करणं फार अशुभ मानलं जातं . जर तुम्ही या दिवशी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर राहु काळाची वेळ नक्कीच लक्षात ठेवा.

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा कऱण्यात येतो. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने त्याचं मूल्य अधिक वाढतं.

आजच्या दिवशी कशी आहे राहू काळ?

राहू काळ हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी 02.51 ते 04.15 पर्यंत असतो. त्यामुळे आजच्या दिवशी या काळात चुकूनही खरेदी करू नये. या राहु काळात खरेदी केल्याने शुभ फळ मिळत नाही, असं म्हणतात.

त्याचप्रमाणे गुलिक काल दुपारी १२.०५ ते १.२८ पर्यंत आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी गुलिक आणि राहुकाळात खरेदी करू नका. असं मानलं जातं की, या काळात खरेदी केल्याने तुम्ही कंगाल होऊ शकता.

शुभ मुहूर्तावर करा खरेदी

जर तुम्ही धनत्रयोदशीला कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज रोजी रात्री 11:42 ते 12:27 पर्यंत खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ आहे. यानंतर 4:20 ते 6:15 पर्यंत शुभ मुहूर्त तयार होतोय. या काळात जर तुम्ही खरेदी केलीत तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT