Bada Mangal 2025 saam tv
लाईफस्टाईल

Bada Mangal: आज वर्षातील दुसरा मोठा मंगळ; हनुमानजींना 'या' गोष्टी करा अर्पण, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Bada Mangal 2025: आज दुसरा मोठा मंगल साजरा केला जाणार आहे. या दिवशी हनुमानाची पूजा विधिवत केल्याने इच्छित फळे मिळतात, असं मानलं जातं. या दिवशी हनुमानाजींना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात ते पाहूयात

Surabhi Jayashree Jagdish

जेष्ठ महिन्यात येणारा मंगळवार खूप खास मानला जातो. याचं कारण म्हणजे या महिन्यात येणारा मंगळवार हा "बुढवा मंगल" किंवा "मोठा मंगळ" असतो. यामधील पहिला मोठा मंगल १३ मे रोजी होता. तर आता दुसरा मोठा मंगळ हा आज म्हणजेच २० मे रोजी साजरा केला जाणार आहे.

मोठा मंगलच्या शुभ मुहूर्तावर हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. याशिवाय मोठा मंगळच्या दिवशी अनेक ठिकाणी भंडारा देखील आयोजित करण्यात येतो. बडा मंगल निमित्त भंडारा आयोजित केल्याने बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात नेहमीच सुख, समृद्धी आणि कल्याण राहते. तर चला तर मग जाणून घेऊया की बडे मंगलच्या दिवशी हनुमानजींना कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत.

सिंदूर

हनुमानजींच्या पूजेमध्ये सिंदूरचा वापर केला जातो. आज मोठा मंगलच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करायला विसरू नका. पवनपुत्राला सिंदूर अर्पण केल्याने भगवान राम आणि माता सीतेचा आशीर्वाद देखील मिळतो.

चमेलीचं तेल

मोठा मंगळच्या दिवशी बजरंगबलीला चमेलीचे तेल आणि चोळ देखील अर्पण करावा. या दिवशी हनुमानजींसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं.

बेसनाचा लाडू

हनुमानाला बेसनाचा लाडू फार प्रिय आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बेसनाच्या लाडूचा प्रसाद अवश्य दाखवावा. हा प्रसाद दाखवल्यामुळे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

बुंदी

मोठा मंगळच्या दिवशी तुम्ही हनुमानाला बुंदी किंवा बुंदीचे लाडू देखील अर्पण करू शकता. हनुमानजींना बुंदी खूप आवडते आणि ती अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात.

केळी

बडे मंगळलच्या दिवशी बजरंगबलीला केळी अर्पण करा. केळी अर्पण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. भक्तांना असलेल्या सर्व समस्या यावेळी ते दूर करतात.

तुळस

तुळशीशिवाय हनुमानाची पूजा आणि नैवेद्य पूर्ण होत नाही. मोठा मंगळच्या दिवशी बजरंगबलीला तुळस अवश्य अर्पण करा. यावेळी तुम्ही हनुमानजींना जे काही अर्पण कराल त्यात तुळशीचे पान अवश्य घाला.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT