Friday Remedies To Get money saam tv
लाईफस्टाईल

Shukrawar Che Upay:: आर्थिक तंगी दूर करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी करा 'हे' खास उपाय; लगेच मिळेल लाभ

Friday remedies financial problems : शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे, जी धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. तसेच, हा दिवस शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो भौतिक सुख, सौंदर्य आणि समृद्धीचा कारक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित केलेला असतो. यानुसार, शुक्रवारचा दिवस हा धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मीला समर्पित केलेला असतो. असं मानलं जातं की, या दिवशी जर तुम्ही देवी लक्ष्मीची पुजा केली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. अशावेळी शुक्रवारी केलेले काही चमत्कारिक उपाय तुमचं नशीब बदलू शकतात.

जर श्रद्धेने आणि भक्तीने माता लक्ष्मीची पूजा केली आणि काही विशेष उपाय केले तर लवकरच पैशाचा वर्षाव सुरू होतो. जाणून घेऊया शुक्रवारच्या दिवशी कोणते विशेष उपाय केल्याने फायदा होतो.

कनकधारा स्तोत्राचं पठण

कनकधारा स्तोत्र हे आदि शंकराचार्य यांनी रचलेलं एक प्रभावी स्तोत्र मानलं जातं. जे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर शांत मनाने त्याचं पठण करावं.

  • हे पठण करताना, देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्या समोर ठेवा.

  • दिवा लावा आणि पांढरे कमळाचं फूल अर्पण करा.

  • यामुळे आर्थिक संकटातून लवकर सुटका होण्यास मदत होते आणि घरात पैशाचा ओघ वाढतो.

गरीबांना मिठाई आणि वस्त्र दान करा

शुक्रवारी गरिबांना पांढरे कपडे, तांदूळ, खीर किंवा मिठाई दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यावेळी विधवा महिलांना दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं.

  • कर्जापासून मुक्तता मिळते

  • अडकलेल्या उत्पन्नाचे मार्ग खुले होतात

  • नशीब बलवान होते आणि ग्रहदोषही कमी होतात.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक

शुक्रवारी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि त्यावर रोली किंवा कुंकूने स्वस्तिक बनवा. यावेळी तुम्ही घरातील पूजास्थळी श्रीयंत्र स्थापित करू शकता.

  • गंगाजलाने श्रीयंत्र शुद्ध करा.

  • त्यावर केशर, तांदूळ आणि फुले अर्पण करा.

  • दररोज एक दिवा लावा आणि त्याला आदरांजली वाहा.

  • श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि त्याची नियमित पूजा केल्याने धनाचा प्रवाह स्थिर होतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT