Tips For blocked Nose Saam Tv
लाईफस्टाईल

Tips For blocked Nose : चोंदलेल्या नाकामुळे त्रस्त आहात ? मग 'हे' करुन पहा

हिवाळ्यात सर्दीमुळे अनेकदा आपले नाक बंद पडते. त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

कोमल दामुद्रे

Tips For blocked Nose : हिवाळा म्हटलं की, वातवारणात गारवा पसरतो. या ऋतूमध्ये सगळीकडे धुकेच धुके दिसू लागतात. हा ऋतू जितका हवाहवासा वाटतो तितकाच नकोसा देखील. वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक संसर्गजन्य आजार जडतात.

नाक बंद, सर्दी, डोकेदुखीने (Headache) त्रस्त असणाऱ्याचे अशा स्थितीत शरीराचे काय हाल होतात, हे फक्त त्यांनाच ठाऊक असते, ज्याला नाक बंद झाल्यामुळे श्वासदेखील घेता येत नाही. यावर वेळीच उपचार न केल्यास तो विषाणू किंवा फ्लूचे रूप धारण करू शकतो.

हिवाळ्यात सर्दीमुळे अनेकदा आपले नाक बंद पडते. त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या समस्येमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच झोपेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की काही पद्धतींचा अवलंब करून ही समस्या टाळता येऊ शकते. हिवाळ्यात चोंदलेल्या नाकापासून सुटका कशी कराल (home remedies for blocked nose)

हे उपाय करुन पहा

  • बंद झालेले नाक उघडण्यासाठी तुम्ही स्टीम घेऊ शकता. अशा परिस्थितीत गरम पाणी घ्या आणि त्याची वाफ सतत घेत रहा. असे केल्याने गरम हवा नाक आणि घशापर्यंत पोहोचते आणि फुफ्फुसांवर परिणाम करते. तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा स्टीम घेऊ शकता. असे केल्याने बंद झालेल्या नाकापासून आराम मिळू शकतो.

  • नाक बंद झाल्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवा आणि नंतर नाकावर ठेवा. असे केल्याने नाकातील श्लेष्मा बाहेर पडेल. ही पद्धत दिवसातून दोनदा करा. आराम मिळेल.

  • नाक बंद होण्याच्या समस्येवरही आल्याच्या (Ginger) सेवनाने मात करता येते. आल्यामध्‍ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात जे बंद झालेल्या नाकापासून आराम मिळवून देतात. अशावेळी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी घेऊ शकता.

  • नाक बंद होण्याच्या समस्येवरही लसणाच्या सेवनाने मात करता येते. अशावेळी तुम्ही ३ ते ४ कळ्या घेऊन पाण्यात उकळा. आता या मिश्रणात हळद, मिरपूड घालून सेवन करा. असे केल्याने आराम मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

SCROLL FOR NEXT