Diwali Shopping 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Shopping 2022 : दिवाळीत फ्लोरल कपड्यांसोबत सुंदर दिसतील 'या' अॅक्सेसरीजला, आजच खरेदी करा

दिवाळी सण जवळ आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Shopping 2022 : दिवाळी (Diwali) सण जवळ आला आहे. घर आणि पूजेच्या वस्तूंची साफसफाई करण्याबरोबरच लोक हा उत्सव साजरा करण्यासाठी पाहुण्यांना घरी बोलवतात. जर तुम्ही पाहुण्यांनकडे जाण्यास सहभागी होण्यासाठी लूक शोधत असाल तर फ्लोरल प्रिंटचे कपडे घाला. तसेच या कपड्यांना खास अॅक्सेसरीजच्या मदतीने क्लासी लूक द्या. प्रत्येकामध्ये तुम्ही पूर्णपणे वेगळे दिसाल. फ्लोरल प्रिंट साडीपासून ड्रेसेस किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांपर्यंत (Cloths) तुम्ही ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अॅक्सेसरीजच्या मदतीने तुम्ही हे लूक कसे वेगळे करू शकता.

Pearl Jewellery

मोत्याचे दागिने घाला -

मोत्याचे दागिने सर्वांवर क्लासी आणि रॉयल लुक देते. फ्लोरल प्रिंटच्या कपड्यांसोबत मोत्याचा हार, कानातले, बांगड्या घालू शकता. यामुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल. अशा प्रकारचे दागिने तुम्ही स्थानिक बाजारातून किंवा ऑनलाइन सहज खरेदी करू शकता.

Bun With Accessories

केसांचा अंबाडा -

तुमचे केस वेगळ्या स्टाईलमध्ये बनवून तुम्ही स्टायलिश देखील दिसू शकता. फ्लोरल प्रिंटच्या कपड्यांसह, केसांमध्ये गुलाबाची फुले घालून तुम्ही लूक परिपूर्ण करू शकता. साध्या सरळ केसांनी किंवा कुरळे केसांनी ही फुले खूप सुंदर दिसतात. तसेच, ते देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत.

Floral Dupatta

दुपट्टा -

जर तुम्ही साधा कुर्ता किंवा लेहेंगा घातला असेल तर सोबत फ्लोरल प्रिंटचा दुपट्टा घ्या. हे स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देईल.

Floral Blouse

फ्लोरल प्रिंट ब्लाउज -

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साध्या साडीशी मॅच करून फ्लोरल प्रिंटचा ब्लाउज घालू शकता. ते खूप सुंदर दिसेल आणि तुम्हाला एक वेगळा लुक देईल. कतरिना कैफसारखा हा लूक वापरून पहा.

Floral Crop Top and Palazo

आजकाल इंडो-वेस्टर्न लुकमध्ये क्रॉप टॉप आणि पलाझो -

खूप ट्रेंडमध्ये आहेत. या लुकसोबत तुम्ही श्रग मॅच करू शकता. फ्लोरल प्रिंट श्रग स्टायलिश दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT