coffee mug saam tv
लाईफस्टाईल

Coffee Mug: ऑफिसमधील कॉफीचा मग तुमच्यासाठी ठरतोय घातक; संशोधानातून धक्कादायक बाबी उघड

Coffee Mug: संशोधकांना असं आढळून आलंय की, सुमारे 90% ऑफिस कॉफी मगमध्ये विविध प्रकारचे जंतू असतात. एवढेच नाही तर यातील २०% कपवर विष्ठेचे कणही आढळून आल्याचे संशोधनात दिसून आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही ऑफिसमध्ये वापरत असलेला मग किंवा घरी वापरत असलेला मग किती सुरक्षित आहे? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही दररोज वापरत असलेला मग तुम्हाला आजारी पाडतोय. संशोधकांना असं आढळून आलंय की, सुमारे 90% ऑफिस कॉफी मगमध्ये विविध प्रकारचे जंतू असतात. एवढेच नाही तर यातील २०% कपवर विष्ठेचे कणही आढळून आल्याचे संशोधनात दिसून आलंय.

शास्त्रज्ञांच्या मते, या बॅक्टेरियाच्या वाढीचं मुख्य कारण स्वयंपाकघरातील स्पंज आहे. जे आपण कमी वेळा स्वच्छ करतो. ज्यावेळी आपण या स्पंजने कॉफी मग पुसतो, तेव्हा कोलिफॉर्म बॅक्टेरिया आणि ई. कोलाईसारखे धोकादायक बॅक्टेरिया मगला चिकटतात, जे तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी समस्या बनू शकतात.

ऑफिसमध्ये मगमधून कॉफी पिताना सावधान

ॲरिजोना युनिवर्सिटीतील एका अभ्यासात असं आढळून आलंय की, अंदाजे 90% ऑफिस कॉफी मग बॅक्टेरियाने दूषित होतात आणि 20% मध्ये बॅक्टेरियाचे मल ट्रेस झालेत. सार्वजनिक स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे स्पंज हे हानिकारक जीवाणू पसरवण्यात मोठी भूमिका बजावतात, असं या अभ्यासातून दिसून आलंय.

कॉफी मगमध्ये आहेत हजारो बॅक्टेरिया

डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिलाय की, ऑफिस किचनमध्ये ठेवलेले स्पंज हे बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य ठिकाण आहेत. हे स्पंज नियमितपणे बदलले जात नाहीत आणि ते तुमच्या कॉफी मग सारख्या गोष्टींवर सहजपणे जीवाणू पसरवू शकतात. यामुळे आजार पसरण्याची शक्यता खूप जास्त असते.

डॉक्टर फिलिप टिएर्नो यांनी सांगितलं की, आपण सर्वांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. खासकरून तुम्ही हात धुणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपले हात धुत नाही तेव्हा आपले हात घाण होतात, ज्यामध्ये काही जंतू देखील असतात जे आपल्याला आजारी पाडू शकतात. हे जंतू बरेच दिवस जिवंत राहू शकतात आणि जेव्हा आपण काही खातो किंवा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT