SBI EMI Offer  Saam tv
लाईफस्टाईल

SBI EMI Offer : फक्त ६७३ रुपयांमध्ये घरी आणा ७५०० रुपयांचा फोन; दिसतोय IPhone सारखा

Tecno Spark Go 2024 Discount Offer News : देशात Android स्मार्टफोन आयफोनपेक्षाही प्रसिद्ध होत आहे. आयफोन सारखा दिसणारा Android स्मार्टफोन चर्चेत आला आहे. या मोबाईलध्ये काहीसे आयफोन सारखे फिचर्स आहेत.

Vishal Gangurde

Tecno Spark Go 2024 Discount Offer:

देशात Android स्मार्टफोन आयफोनपेक्षाही प्रसिद्ध होत आहे. दुसरीकडे महागडा आयफोन वापरण्याची इच्छा असलेले लोक जुना आयफोन खरेदी करून इच्छा पूर्ण करतात. याचदरम्यान, आयफोन सारखा दिसणारा Android स्मार्टफोन चर्चेत आला आहे. या मोबाईलध्ये काहीसे आयफोन सारखे फिचर्स आहेत. (Latest Marathi News)

आयफोन सारख्या दिसणाऱ्या फोनचं नाव काय?

आयफोन सारख्या दिसणाऱ्या फोनचं नाव Tecno Spark Go 2024 आहे. हा मोबाईल दिसायला आयफोन सारखा आहे. या मोबाईलची किंमत फक्त ७४४९ रुपये इतकी आहे. यामध्ये ४ जीबी RAM सहित 128 जीबी स्टोरेज आहे. तुम्ही हा मोबाईल अवघ्या ६७३ रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता. (Latest Marathi News)

स्मार्टफोन कसा खरेदी कराल?

एसबीआयच्या ईएमआय ऑफरच्या आधारे हा फोन खरेदी करू शकता. या फोनसाठी १२ महिने हप्ते भरावे लागतील. तुम्ही ईएमआयच्या आधारावर मोबाईल खरेदी करत असाल तर तुम्हाला ६१९ रुपये अधिकचे मोजावे लागतील. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोनसाठी एकूण ८,०६९ रुपये मोजावे लागतील.

स्मार्टफोनचे फिचर्स कसे आहेत?

फिचर्सविषयी बोलायचं झालं तर , Tecno Spark GO 2024 मॉडलमध्ये पांडा स्क्रीन प्रोटेक्शन मिळत आहे. तसेच 6.56-इंच डॉट-इन डिस्प्ले आणि स्क्रॉलिंग अनुभव वाढण्यासाठी 90Hz रिफ्रेश रेट मिळत आहे.

स्मार्टफोनची बॅटरी कशी आहे?

या स्मार्टफोनमध्ये आयफोन सारखा डायनामिक पोर्ट देखील आहे. या स्मार्टफोनचा लूक iPhone 14 Pro मॉडल आणि iPhone 15 सीरीज सारखा आहे. तसेच फोनमध्ये १३ एमपी + ०.८ एमपी फ्रन्ट कॅमेरा मिळत आहे. त्याचबरोबर 5000 mAh चांगली बॅटरी मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT