WhatsApp Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsAppच्या ग्रुपमधला मेसेज पाहिलाच नाही.,असं म्हणणाऱ्यांचं खोटं येणार समोर; पण कसं? जाणून घ्या

WhatsApp: . काही युझर्स WhatsApp या चॅटिग अ‍ॅपचा वापर कार्यालयीन कामासाठी करत आहेत.

Bharat Jadhav

Whats App Tips:

मेटाचं लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रत्येक सर्वजण करत आहेत. काही युझर्स या चॅटिग अ‍ॅपचा वापर कार्यालयीन कामासाठी करत आहेत. कार्यालयाच्या टीममध्ये व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करत सामूहिक सूचना दिली जाते. सर्वांना एकाचवेळी मेसेज मिळावा म्हणून बॉस या चॅटिग अ‍ॅपवर मेसेज पाठवत असतात. परंतु काहीजण हा मेसेज पाहतात आणि त्यावर काही रिप्लाय करत नाहीत. बॉसनं जर त्या मेसेजवरुन प्रश्न केला, तेव्हा मी मेसेज पाहिला नाही सर,असं सरळ खोटं बोलून अनेकजण काम टाळत असतात. (Latest News)

पण व्हॉट्सअ‍ॅपचं एक सेटिंग चालू केली तर कोणी तुमचा मेसेज पाहिला कोणी नाही याची माहिती मिळू शकणार आहे. बहुतेक वापरकर्त्यांना याची जाणीव नसेल, परंतु हे सत्य आहे. ग्रुपमध्ये पाठवलेल्या मेसेजवर लॉग प्रेस केलं तर कोणत्या सदस्याने मेसेज वाचला आहे, हे मेसेज इन्फोद्वारे कळू शकतं. तसेच या सेटिंगच्या मदतीने समोरील व्यक्तीने मेसेज कोणत्या वेळी वाचला याचीही माहिती आपल्याला मिळू शकते.

दरम्यान ही सेटिंग चालू केल्यास ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीनं मेसेज वाचला. तसेच गरज असताना सुद्धा कोणी रिप्लाय केला नाही तेही आपल्याला कळू शकेल. जर उशिरा रिप्लाय केला तरी त्याची चोरी सापडणार आहे. कारण मेसेज कधी पाहिला याची माहिती आपल्याला मिळते. यामुळे उशिरा रिप्लाय का केला असा प्रश्न तुम्ही समोरील व्यक्तीला विचारू शकतात.

दुसरी मोठी गोष्ट म्हणजे व्हॉट्स अ‍ॅपची ही सेटिंग बाय डिफॉल्ट असते. म्हणजेच काय ही सेटिंग बंद करण्याचा पर्याय नाहीये. यामुळे तुम्हीही तुमच्या ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असाल तर मेसेज आल्यानंतर रिप्लाय करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT