Upcoming Tata Cars in India 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Upcoming Tata Cars: जबरदस्त आणि दमदार, टाटा घेऊन येत आहे नवीन कार

Satish Kengar

Upcoming Tata Cars in India 2023: टाटा मोटर्स ही भारतीय बाजारपेठेतील ऑटोमोबाईल क्षेत्रातील तिसरी सर्वात यशस्वी कंपनी आहे. याचा क्रमांक मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई इंडियासोबत येतो.

मात्र इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटचा विचार केल्यास, कोणीही टाटाच्या जवळपासही नाही. आता कंपनीने नवीन कार फ्रेस्टची (Frest) नोंदणी केली आहे. एक वर्षानंतर सरकारनेही या ट्रेडमार्कला मान्यता दिली आहे. यातच कंपनी भारतात त्याच नावाने आपली नवीन मिडसाईज एसयूव्ही लॉन्च करू शकते. टाटा कर्व एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत फ्रेस्ट नावाने लॉन्च केली जाईल, अशी चर्चा आहे.  (Latest Marathi News)

ही कार इलेक्ट्रिक (Electric Cars) आणि ICE अशा दोन्ही प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल. कर्व्हवर आधारित इलेक्ट्रिक व्हेरिएंट पुढील वर्षी लॉन्च होणार आहे, तर नवीन पेट्रोल इंजिनसह सुसज्ज ICE व्हेरिएंट 2025 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. या कूप-एसयूव्हीचे डिझाइन, बॉडी स्टाइलमुळे टाटा मोटर्सला कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये वाढ होऊ शकते. (Latest Auto News in Marathi)

कॉम्पॅक्ट मॉडेलमधून मिळणार अनेक एलिमेंट्स

एचटी ऑटोच्या वृत्तानुसार, 'फ्रेस्ट' या शब्दाचा अर्थ 'ताजे' किंवा 'ताजे दिसणारा' असा होतो. मिळालेल्या माहितीनुसार, कर्व्ह कॉम्पॅक्ट कार उत्पादनासाठी तयार होण्याच्या अगदी जवळ होती. 2023 ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केलेले बहुतेक डिझाइन एलिमेंट्स अंतिम उत्पादनामध्ये राखले जाण्याची शक्यता आहे.

टाटा कर्वच्या उत्पादन आवृत्तीमध्ये फ्लश-फिटिंग डोअर हँडल, प्रमुख चाकांच्या कमानी आणि एक आकर्षक सनरूफ मिळणे अपेक्षित आहे. यात टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT