Surya Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2024 : महालक्ष्मी योग! पुढील आठवड्यात ५ राशींना होणार नफा, वैवाहिक जीवनात येणार सुख

Mahalaxmi Yog : ग्रहांच्या संक्रमणामुळे मेष आणि मिथुनसह या ४ राशींच्या लोकांसाठी येणारा आठवडा फायदेशीर ठरेल. समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभेल. जाणून घेऊया त्याबद्दल

कोमल दामुद्रे

Makar Sankranti 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करतात. पुढील आठवड्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. येत्या आठवड्यात मंगळ ग्रहाचा उदय होईल आणि शुक्र धनु राशीत संक्रमण करेल. तसेच मंगळाशी संयोग केल्यामुळे महालक्ष्मी योग तयार होईल.

ग्रहांच्या संक्रमणामुळे मेष आणि मिथुनसह या ४ राशींच्या लोकांसाठी येणारा आठवडा फायदेशीर ठरेल. समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबिक (Family) आणि वैवाहिक (Marriage) जीवनात सुख-शांती लाभेल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मेष

या राशींच्या लोकांच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतील. आरोग्य चांगले राहिल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हा आठवडा अतिशय शुभ आणि यशस्वी (Success) होईल. गुंतवणूकीतून नफा मिळेल. मानसिक शांती मिळेल.

2. मिथुन

मिथुन राशीसाठी हा आठवडा अनुकूल राहिल. महत्त्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने राहिल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आठवड्यात तुमची चिंता कमी होईल. कामाच्या नव्या संधी मिळतील.

3. सिंह

आयुष्यात पुढे जाण्याची आणि इच्छित यश मिळवण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. उत्पन्नात चांगली वाढ होईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा आठवडा शुभ असेल. आरोग्याशी संबंधित समस्येने त्रस्त राहाल.

4. कन्या

या राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामात पूर्ण उत्साही राहाल. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहिल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT