Suhana Sakal Swasthyam Saam tv
लाईफस्टाईल

Suhana Sakal Swasthyam : 'स्वास्थ्यम् सकाळ'चा आरोग्यमेळा! माधुरी दीक्षित साधणार संवाद, कधी व कुठे?

Sakal Swasthyam : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य निरोगी आणि फिट राहावे यासाठी 'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' चा आरोग्यमेळा दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sakal Swasthyam Program :

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहाणे गरजेचे असते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य निरोगी आणि फिट राहावे यासाठी 'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' चा आरोग्यमेळा दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवण्यात आला आहे.

यंदा हा कार्यक्रम १ ते ३ डिसेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे. म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ध्यानधारणा, योग-प्राणायाम, मानसिक आरोग्य, व्यायाम आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. या उपक्रमाचे मुख्य मुख्य प्रायोजक सुहाना मसाले, तर पॉवर्ड बाय प्रायोजक भारती विद्यापीठ, फायनान्शियल हेल्थ पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट), ऊर्जा पार्टनर म्हणून निरामय वेलनेस सेंटर, हेल्थ पार्टनर शारंगधर नॅचरल हेल्थ केअर आहेत. तसेच सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि व फिनोलेक्स केबल्स लिमिटेड असून, ईव्ही पार्टनर एथर आहेत.

सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम् या तीन दिवसांच्या उपक्रमात ध्यान-धारणा, योग प्राणायाम, भावनिक, मानसिक (Mental Health), सामाजिक, अध्यात्मिक वर्तणूक आणि स्वास्थ्यपूर्ण आरोग्य आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत. याचबरोबर उपक्रमांतर्गत 'समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग' या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या स्वास्थ्यम् या पुस्तकाचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात येणार आहे.

1. 'स्वास्थ्यम्' का उपयुक्त?

सध्याच्या धावपळीच्या युगात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. चिंता, काळजी, भीती, तणाव (Stress) वाढत असून, त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मानसिक समस्या आणि स्वास्थ्यासाठी समुपदेशन व योग्य मार्गदर्शन होणे महत्त्वाचे आहे.

तसेच प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातील दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. अशातच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी 'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' हा कार्यक्रम अनेकांना उपयुक्त ठरणार आहे.

2. कार्यक्रम कधी आणि कुठे?

१ ते ३ डिसेंबर २०२३ - पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे

'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी globalswasthyam.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहेत तर रेजिस्ट्रेशन आवश्यक करणे गरजेचे. रेजिस्ट्रेशनसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.

3. अधिक माहितीसाठी विविध सोशल मीडिया फॉलो करा

  • Instagram : instagram.com/globalSwasthyam

  • Facebook : facebook.com/globalSasthyam

  • Twitter : twitter.com/GlobalSwasthyam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT