Weight Loss Tips Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात? वजन कमी करायचे आहे? त्याचे योग्य नियम कोणते ? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबत व्यायामाची देखील योग्य गरज आहे. आपल्याला वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर ते योग्य वेळेत केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

सकाळचा नाश्ता -

Morning Breakfast

वजन कमी करण्यासाठी आपल्याला नाश्त्याची योग्य वेळ माहित असायला हवी. बहुतेक लोक कामाच्या व्यापामुळे नाश्ता करत नाही. ज्यामुळे त्याचे वजन कमी होण्याच्या बदली ते अजून वाढत जाते. याचे कारण असे की वेळेवर नाश्ता न केल्यामुळे आपल्याला दिवसभर भूक लागू शकते. त्यामुळे आपण जास्त जेवण करतो. अतिप्रमाणात खाल्ल्याने आपले वजन वाढू लागते. नाश्ता करण्याची योग्य वेळ (Time) ही सकाळी ७ ते ९ च्या मध्ये आहे. (Weight loss Tips in Marathi)

दुपारचे जेवण -

Lunch

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ देखील असते. बदलेल्या जीवनशैलीमुळे व कामाच्या ताणामुळे ती बहुतेक वेळा आपल्याकडून चुकली जाते. आपण जर नियमितपणे नाश्ता केला तर आपल्या वेळीच भूक लागते व आपली जेवणाची वेळ चुकत नाही. काही लोक नाश्ता चुकवून दुपारचे जेवण व सकाळचा नाश्ता एकाच वेळी करतात. दुपारच्या जेवणाची योग्य वेळ ही १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. या जेवणात आपण चपाती, भाजी, भात व सलादचा समावेश करु शकतो. याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपले वजन नियंत्रणात राहिल.

रात्रीचे जेवण -

Dinner

रात्रीचे जेवण देखील तितकेच हवे जितका सकाळचा नाश्ता आवश्यक आहे. दुपारचे जेवण लवकर केल्यामुळे आपल्याला रात्री लवकर भूक लागते. त्यासाठी काही न्यूट्रीशन आपला मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी रात्रीचे जेवण लवकर करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे रात्रीचे जेवण आपण सायंकाळी ६.३० ते ८ दरम्यान करायला हवे.

या टिप्स लक्षात ठेवा -

- सकाळचा नाश्ता हा सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांनंतर करावा.

- नाश्त्यामध्ये प्रोटीनचा समावेश जास्त असायला हवा.

- नाश्ता हा जवळपास १० च्या आधी करावा.

- दुपारच्या जेवणाची योग्य वेळ ही १२ नंतर आहे.

- नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेत किमान चार तासाचे अंतर असायला हवे.

- दुपारचे जेवण हे ४ नंतर करु नये.

- रात्रीच्या जेवणाची वेळही ७ आधी असायला हवी.

- रात्रीचे जेवण व झोपण्याच्या वेळेत किमान तीन तासाचे अंतर असायला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT