Gmail Spam Emails Saam Tv
लाईफस्टाईल

Gmail Spam Emails : जीमेल ला येणाऱ्या स्पॅम ईमेल पासून त्रस्त आहात ? 'ही' ट्रिक्स वापरुन पहा

ई-मेल ला अनसबस्क्राइब कसे कराल ? त्यासाठी वापरा हे पर्याय

कोमल दामुद्रे

Gmail Spam Emails : आज जगभरात जीमेलचा वापर करणारे बरेच लोक आहेत. कामाच्या ठिकाणांपासून ते शिक्षणांच्या प्रत्येक ठिकाणी जीमेलचा वापर केला जातो. कधी कधी अनवधानाने किंवा शॉपिंग (Shopping) साईट्स, फूड कोट, मूव्ही टिकीट व अशा अनेक ठिकाणी आपण आपल्या जीमेलचे लॉग इन करतो.

जीमेलचे लॉग इन केल्यामुळे आपल्या इतर साईट्स वरुन देखील त्यांचे ई-मेल येऊ लागतात. त्यामुळे आपला ई-मेल बॉक्स फुल होतो. यासोबतच जीमेलवर हॅकर्सही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. हे हॅकर्स स्पॅम ईमेल आणि फिशिंग वेबसाइट्सच्या (Website) माध्यमातून जीमेलचा डेटा हॅक करतात.

ई-मेल ला Unsubscribe करा

तुम्ही तुमच्या वापरात नसलेल्या किंवा तुम्हाला उपयोगी नसलेल्या ई-मेलला अनसबस्क्राइब करू शकतो. हे तुम्हाला निरुपयोगी आणि अवास्तव ई-मेल प्राप्त करण्यापासून थांबवेल.

ई-मेलचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, स्पॅम ई-मेल निवडा आणि त्यानंतर तुम्हाला डिलीटच्या बाजूला एक पर्याय मिळेल, तो म्हणजे रिपोर्ट स्पॅम आणि अनसबस्क्राइब, तुम्ही हा पर्याय दाबा. याचा परिणाम म्हणून या आयडीवरून तुमच्या खात्यावर ईमेल येणे बंद होईल.

स्पॅम ईमेलसाठी फिल्टरचा वापर

Gmail मध्ये एक फिल्टर पर्याय देखील आहे जो तुम्ही स्पॅम ई-मेल शोधण्यासाठी आणि ई-मेल काढण्यासाठी वापरू शकता. हा पर्याय वापरण्यासाठी, तुम्हाला Gmail च्या सर्च बॉक्समध्ये जावे लागेल आणि अनसबस्क्राइब टाइप करावे लागेल. हे सुनिश्चित करेल की, सर्व सदस्यत्व रद्द आणि स्पॅम ई-मेल स्क्रीनवर दिसतील. आता येथे सर्व ई-मेल निवडल्यानंतर, More वर क्लिक करा आणि या पर्यायाप्रमाणे Filter संदेश निवडा. येथे तुम्हाला ई-मेल डिलीट करण्याचा पर्यायही मिळेल.

दोन ईमेल खाती वापरा

हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे दोन ई-मेल खाती वापरणे. तुमचा पहिला ई-मेल आयडी अधिकृत कामासाठी, स्मार्टफोन आणि बँका इत्यादींसाठी वापरा, तर दुसरा ई-मेल आयडी वेबसाइटला भेट देणे, ऑनलाइन खरेदी करणे किंवा तिकीट बुक करणे यासारख्या क्रियाकलापांसाठी वापरा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पहिल्या ईमेल आयडीवर येणारे स्पॅम ई-मेल टाळू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT