Chanakya Niti On Students Saam Tv
लाईफस्टाईल

आयुष्यात विद्यार्थ्यांनी Chanakya Nitiच्या या शब्दांचे पालन करा, प्रत्येक पायरीवर मिळेल यश

Chanakya Niti For Students : विद्यार्थी जीवनासाठी शिस्त ही वरदानापेक्षा कमी नाही. यश मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. केवळ शिस्तीनेच तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी होता. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणात बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत.

Shraddha Thik

Students Life :

आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र तसेच नीतिशास्त्राचे जनक म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणात अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्या विद्यार्थ्याने आपल्या जीवनात (Life) अंमलात आणल्यास तो प्रत्येक ध्येय गाठू शकतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपले ध्येय गमावू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, ध्येयाप्रती प्रामाणिक राहूनच ध्येय गाठता येते. विद्यार्थ्याने परिश्रमाला कधीही घाबरू नये, कारण परिश्रमाशिवाय परीक्षेत यश (Success) मिळविण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. अशा स्थितीत परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यानी आपले लक्ष केवळ आपल्या ध्येयावर ठेवावे.

शिस्तही महत्त्वाची आहे

विद्यार्थी जीवनासाठी शिस्त ही वरदानापेक्षा कमी नाही. यश मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. केवळ शिस्तीनेच तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी होता. त्यामुळे झोपेपासून उठण्यापर्यंत आणि अभ्यासापर्यंतचा ठराविक वेळ ठरवून घ्या. तसेच तुमच्या अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घ्या.

आळस दूर करा

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, विशेषतः विद्यार्थी जीवनात. जर आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवत असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी आळशीपणा दूर केला पाहिजे, असे चाणक्य सांगतात. कोणतेही काम उद्यासाठी पुढे ढकलण्याची चूक करू नका. आजचे काम आजच पूर्ण करा, म्हणजे उद्यावर जास्त भार पडणार नाही.

आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे

अभ्यासासोबतच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची प्रकृती चांगली राहिली तरच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकाल. अशा स्थितीत आचार्य चाणक्य सांगतात की, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि स्वतःला निरोगी ठेवा. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तुम्हाला अभ्यासादरम्यान झोप येत नाही आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT