Cooking tips, Kitchen tips,  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

परफेक्ट बॅटर बनत नसेल तर चुकू शकतो साउथ इंडियन स्टाइल डोसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साउथ इंडियन स्टाइल डोश्याची चव हल्ली सगळीकडे चाखायला मिळते. तो कितीही टेस्टी असला तरी तो संपूर्णपणे त्याच्या बॅटरवर अंवलबून असतो.

हे देखील पहा -

बॅटर जितके चांगले तितका डोसा चवदार असेल. डोसा हा हल्ली स्ट्रीट (Street) फूड म्हणून खूप पसंत केला जातो, परंतु आरोग्यासाठी चांगला असल्याने त्याचा वापर घरांमध्ये नाश्ता आणि स्नॅक्स म्हणूनही होऊ लागला आहे. परफेक्ट डोसा घरीच बनवायचा असेल तर त्यासाठी 'परफेक्ट पिठ' कसे बनवायचे हे जाणून घ्या. या काही टिप्स (Tips) लक्षात घेऊन आपण 'परफेक्ट डोसा बॅटर' तयार करू शकतो.

परफेक्ट बॅटर बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

१. आपण डोसा बनवण्यासाठी पिठ तयार करत असू तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. बॅटर तयार करण्यासाठी आवश्यक घटकांचे प्रमाणित संतुलन असणे गरजेचे आहे. माप योग्य नसल्यास पिठा खराब होऊ शकते. परफेक्ट बॅटर बनवण्यासाठी ३ वाट्या तांदूळ आणि १/२ वाटी उडीद डाळ यांचे असे प्रमाण राखले पाहिजे. आपल्या घरातील खाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार त्याचे प्रमाण निश्चित केले पाहिजे.

२. डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवत असाल तर तांदूळ आणि डाळ भिजण्यासाठी मोठे भांडे वापरा. लहान भांडे घेतल्याने पाणी (Water) कमी राहते व ते पूर्णपणे भिजत नाही. त्यासाठी आपण मोठ्या भांड्यात भिजवण्याचा प्रयत्न करा.

३. आपल्या घरी काही विशेष कार्यक्रम असेल किंवा आपण पाहुण्यासाठी डोसा बनवत असू तर तो जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावा. त्यासाठी बॅटरमधे संतुलन असणे गरजेचे आहे.

४. बाहेर मिळणाऱ्या डोश्यासारखा डोसा बनवायचा असेल तर बॅटर चांगले आंबले पाहिजे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात १० ते १२ तास व उन्हाळ्यात किमान ६ ते ८ तास आपण त्याला चांगले आंबविले पाहिजे.

५. बॅटर तयार झाल्यानंतर कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी तवा गरम करुन बॅटर ओतण्यापूर्वी त्यावर थोडं थंड पाणी टाका, त्यानंतर तव्यावर तेल पसरवून नंतर बॅटर घाला, हे करत असताना बॅटर तव्यावर चिकटणार नाही आणि कुरकुरीत डोसा तयार होईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT