Sleep Debt  Saam Tv
लाईफस्टाईल

Sleep Debt : अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम, वेळीच घ्या काळजी; अन्यथा...

Sleep Deprivation Affect Health : आठवडाभर कमी झोपून वीकेंडला तुम्हालाही जास्त वेळ झोपण्याची सवय आहे का? आपल्यापैकी बरेच लोक असा विचार करतात. सुट्टीच्या दिवशी आपण झोपेची कमतरता भरुन काढतो.

कोमल दामुद्रे

Sleep Deprivation and Deficiency :

आठवडाभर कमी झोपून वीकेंडला तुम्हालाही जास्त वेळ झोपण्याची सवय आहे का? आपल्यापैकी बरेच लोक असा विचार करतात. सुट्टीच्या दिवशी आपण झोपेची कमतरता भरुन काढतो.

तुम्हाला किती वेळ झोपण्याची गरज आहे? तुम्ही किती वेळ झोपू शकता? तुम्ही किती वेळेत झोपत आहात याला स्लिप डेट असे म्हटले जाते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर (Health) कसा परिणाम होतो जाणून घेऊया.

1. सक्रीय न राहाणे

झोपेच्या कमतरतेमुळे शरीराला अधिक नुकसान होते. रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास तुम्हाला दिवसा झोप येते. त्यामुळे डोळे सतत बंद होतात. शरीराची सर्कॅडियन लय विस्कळीत होते. या कारणांमुळे शरीर थकलेले राहाते. तसेच शरीरातील ऊर्जा कमी होते.

2. रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम

पुरेशी झोप घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच अनेक आजारांपासून (Disease) बचाव होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास प्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होते. झोपेत असताना आपली रोगप्रतिकारक शक्ती अँटी -बॉडीज आणि साइटोकाइन्स तयार करते, जे आपल्या सूक्ष्मजंतूंना आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.

3. वजन वाढणे

झोपेचा आपला चयापचयावरही परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे हे खराब होऊ शकते. शरीरातील सर्कॅडियन लय तुम्ही कधी झोपावे किंवा कधी खावे याविषयी माहिती देते. चयापचय विस्कळीत झाले तर तुमचे वजन वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT