Skin Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? 'या' पदार्थांचा समावेश करा, त्वचा राहील टवटवीत

कोरड्या त्वचेच्या समस्या स्त्री आणि पुरूष दोघांनाही येत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dry Skin Treatments : एपिडर्मिसमध्ये ऑईल किंवा पुरेसे पाणी नसल्याने कोरड्या स्किनच्या समस्या येतात. कोरड्या त्वचेच्या समस्या स्त्री आणि पुरूष दोघांनाही येत असतात. त्यामुळे लोक या समस्येमुळे खूप चिंतित असतात.

वेगवेगळे जेल, स्किन क्रीमचा वापर करून सुद्धा त्रास कमी होते नाही काही वेळा त्यांचा साईड इफेक्ट होऊन त्रास अधिक वाढतो. कोरड्या त्वचेवर लाल पुरळ येतात आणि ते खूप जळतात अश्या वेळेस साबण, फेसवॉश याचा वापर टाळावा.

नियमित आणि योग्य आहार न घेतल्याने कोरड्या त्वचेच्या (Skin) समस्या तसेच इतर अजूनही आरोग्या संबधित समस्या येत असतात त्यामुळे तुमच्या आहारात योग्य पदार्थचा समावेश केला पाहिजे. या लेखात दिलेल्या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात (Diet) समावेश करू शकता आणि कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतील.

किवी फ्रूट -

जर तुमची स्किन कोरडी पडत असेल तर किवी फ्रूट खाल्यावर तुमच्या स्किन प्रॉब्लेम हळूहळू कमी होतील यामध्ये व्हिटॅमिन चे प्रमाण खूप जास्त असते.किवी चा उपयोग शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी केला जातो.तसेच एखादी जखम बरी करण्यासाठी किवी खातात.

हळद -

हळद हे खूप गुणकारी आहे.हळदीचा उपयोग अनेक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केला जातो तसेच कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी हळद खूप उपयुक्त आहे.हळदीत एंटीबायोटिक गुण असतात जे चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी मदत करते.

जास्त पाणी प्या -

स्किनच्या अधिक प्रॉब्लमस तर कमी पाणी पिल्यामुळे होतात. रोज तीन लिटर पाणी पीलेच पाहिजे. हिवाळ्यात आपण जास्ती पाणी पीत नाही त्यामुळे स्किन कोरड्या पडण्याच्या अधिक समस्या हिवाळ्यातच दिसतात. पाणी जास्ती पिल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा हळूहळू कमी होऊन जाईल.

ड्राय फ्रूटस -

तुमच्या आहारात काजू, बदाम,पिस्ता,अक्रोड या ड्राय फ्रूटस चा समावेश करा यामध्ये प्रोटीन,व्हिटॅमिन भरपूर असतात. व्हिटॅमिन ई यामधून मिळते त्यामुळे ड्राय फ्रूटसचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.तुमची स्किन सॉफ्ट होते आणि जास्ती शाइन करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT