Health tips, Skin care, Skin care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Damaging Home Remedies: या गोष्टी कधीही विचार न करता त्वचेवर लावू नका, या घरगुती उपायांनी आपली त्वचा होऊ शकते खराब

चुकूनही त्वचेवर हे पदार्थ लावू नका.

कोमल दामुद्रे

Skin damaging home remedies : त्वचेची काळजी घ्यायची असली की, आपण त्यासाठी अनेक उपाय करत असतो. आजीपासून आईने दिलेला महत्त्वाचा सल्ला आपण सतत विचारात घेत असतो.

हे देखील पहा -

हल्ली आयुर्वेदिक किंवा सोशल मिडियाच्या ट्रेंडनुसार आपण चेहऱ्यावर उपाय करुन पहात असतो. पण, बेसन, दही किंवा हळद याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला किती नुकसान होऊ शकतं हे माहीत नसतं. जर तुम्ही विचार न करता तुमच्या त्वचेवर काहीही लावले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण त्वचा सुधारण्याऐवजी काही गोष्टी त्वचेला कायमचे नुकसान करू शकतात. आज याच गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट जितकी चांगली असेल तितकी ती त्वचेवर खराब होऊ शकते. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पिंपल्स आणि डाग यासाठी टूथपेस्ट चेहऱ्यावर अनेकदा लावली जाते. पण त्यामुळे मुरुम आकुंचन पावतात व त्यामुळे त्वचेवर खाज येऊ लागते. यामुळे त्वचेच्या संरक्षणात्मक थराला इजा होऊ शकते.

२. बेकिंग सोडा वेगवेगळ्या घरगुती कामात उपयोगी पडतो परंतु, त्याचे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बेकिंग सोडा त्वचेला त्रास देऊ शकतो. विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्यांनी यापासून खूप अंतर ठेवावे आणि ते कधीही चेहऱ्यावर याचा वापर करु नये.

३. व्हाईट व्हिनेगर किंवा सफरचंद सायडर व्हिनेगर हे पाण्यात मिसळूनच वापरतात आणि त्यावर खूप लक्ष दिले जाते. बाटलीतून थेट व्हिनेगर लावल्याने त्वचा जळते आणि पिगमेंटेशनचा त्रास सुरु होऊ शकतो.

४. मीठाचा अतिवापर जितका शरीरासाठी हानिकारक आहे तितकाच तो त्वचेसाठी देखील हानिकारक आहे. आपली त्वचा संवेदनशील असेल किंवा मुरुमे येत असतील तर त्यावर चुकूनही मीठ लावू नका.

५. त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी साखरेचा भरपूर वापर केला जातो, परंतु काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते. खरं तर साखरेपासून स्क्रब बनवला जातो, जो त्वचेला एक्सफोलिएट करतो. त्वचेवर साखर चोळण्यास सुरुवात करता तेव्हा जळजळ होऊ लागते. कोणताही स्क्रब त्वचेवर घासू नये, तर स्क्रब हलक्या हातांनी अर्ध्या मिनिटापर्यंत चेहऱ्यावर फिरवावा. साखरेचा (Sugar) स्क्रब बनवून तो लावला तर विशेष काळजी घ्या की त्याचा हलका वापर करा आणि आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा लावू नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT