Skanda Shashti and Saturday saam tv
लाईफस्टाईल

Skanda Shashti puja: स्कंद षष्ठी आणि शनिवार योग; शनि चालीसा पठणाने आर्थिक अडचणी कमी होतील?

Skanda Shashti and Saturday: हिंदू पंचांगानुसार स्कंद षष्टीचा दिवस आणि शनिवार एकत्र आल्याने धार्मिक दृष्ट्या विशेष योग निर्माण झाला आहे. या दिवशी शनी देवाची आराधना करून शनी चालीसा पठण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आज, २४ जानेवारी २०२६ रोजी स्कंद षष्ठी व्रत आणि शनिवार आहे. शनिदेवाची पूजा करण्यासाठी आजच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि सूर्यास्तानंतर शनि चालीसा पठण करा. असं मानलं जातं की, यामुळे आर्थिक अडचणी कमी होतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यास मदत होते.

शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी, उत्तर भाद्रपद नक्षत्र आणि शिव योगाचा प्रभाव आज दुपारपर्यंत राहणार आहे. चंद्र मीन राशीत असल्यामुळे मन अधिक संवेदनशील, करुणामय आणि अंतर्मुख राहण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक विचार, सेवाभावी कामं आणि शांततेने निर्णय घेणं आज लाभदायक ठरणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल षष्ठी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: शनिवार

  • नक्षत्र: उत्तर भाद्रपद

  • योग: शिव

  • करण: कौलव

  • चंद्र राशि: मीन

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:51:46 AM

  • सूर्यास्त: 05:41:01 PM

  • चंद्रोदय: 10:07:06 AM

  • चंद्रास्त: 10:59:41 PM

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

11:55:00 AM ते 12:37:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 09:34:05 AM ते 10:55:15 AM

यमघंट काल: 01:37:33 PM ते 02:58:43 PM

गुलिकाल: 06:51:46 AM ते 08:12:56 AM

आज कोणत्या चार राशींना दिवस विशेष चांगला आहे?

मीन रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मनःशांती मिळणार आहे. अंतःप्रेरणेवर घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात.

वृश्चिक रास

कामातील अडथळे दूर होतील. संयमाने आणि शांततेने घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन विचारांसाठी दिवस अनुकूल आहे.

कर्क रास

कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहणार आहे. भावनिक आधार मिळण्यास मदत होईल. घरगुती कामं किंवा चर्चा यशस्वी ठरू शकतात.

मकर रास

आज स्थिरता आणि जबाबदारीची जाणीव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी विश्वास वाढेल आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT