hand elbow freepik
लाईफस्टाईल

Skin Care Tips: हातांच्या कोपराच्या काळेपणावर मात करणारे सोपे घरगुती उपाय, एकदा ट्राय करुन पाहाच

Elbow Care: तुम्हाला घरच्या घरी कोपऱ्यांवरील काळसरपणा कमी करायचा असल्यास, आम्ही दिलेले सोपे आणि प्रभावी उपाय नक्की वापरून पाहा.

Dhanshri Shintre

आपण चेहऱ्याची काळजी घेणारे असतो, पण शरीराच्या काही महत्वाच्या भागांकडे लक्ष देत नाही, जसे कोपरं. कोपऱ्यांमुळे बर्‍याच लोकांना अर्ध्या बाह्यांचे कपडे घालायला संकोच होतो. जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कोपऱ्यांच्या काळेपणामुळे त्रास होतो. बाजारातील अनेक क्रीम परिणामकारक नसतात. म्हणून आम्ही काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे कोपऱ्यांचा काळेपणा कमी होईल.

लिंबू आणि मध

लिंबू आणि मध कोपऱ्यांच्या काळेपणावर प्रभावी उपाय आहेत. लिंबूतील ब्लीचिंग घटक काळेपणा कमी करतात, तर मध त्वचेला ओलावा देतो. अर्धा लिंबू कोपऱ्यावर हलक्या हाताने चोळा, त्यानंतर मध लावा, १५ मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.

बेसन आणि दही

ही पेस्ट त्वचेवरील मृत पेशी आणि काळे डाग काढून टाकण्यास मदत करते. बेसन आणि दही मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट कोपऱ्यावर लावा आणि थोडा वेळ तसे ठेवून नंतर धुवा. वापरणे अगदी सोपे आहे.

नारळ तेल आणि साखर

कोपऱ्यावरचा काळेपणा मृत त्वचेमुळे होतो. त्यासाठी खोबरेल तेल आणि पिठीसाखरेची पेस्ट तयार करा. काळपट भागावर १०-१५ मिनिटे मसाज करा, नंतर पाणीने धुवा. आठवड्यात त्वचेतील फरक जाणवेल आणि कोपर मऊ व स्वच्छ होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

Dharashiv: पुतण्या काकाच्या मुळावर उठला, किडनॅप करून बेदम मारले; साडेसहा एकर जमीन केली नावावर

Maharashtra Live News Update: अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरवात

Kidney: सावधान! कामात लक्ष लागत नाहीये? किडनीच्या बिघाडामुळे मेंदूवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Raj Thackeray : राज ठाकरे-शिंदे भेटीवर संजय राऊत संतापले; म्हणाले, महाराष्ट्राच्या....

SCROLL FOR NEXT