Sim Card Rules  Saam Tv
लाईफस्टाईल

Sim Card Rules : Airtel, Jio व Vi सिमकार्ड वापरकर्त्यासाठी नवा नियम, २४ तास राहाणार आता बंद

जर तुम्ही Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL-MTNL वापरकर्ते असाल तर तुम्हाला या नवीन नियामांबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

कोमल दामुद्रे

Sim Card Rules : हल्ली विविध मोबाईल कंपन्या आपल्याला अनेक सिमकार्ड वरती नवनव्या सुविधा देत असतात. Jio, Airtel, Vodafone-Idea च्या फोन रिचार्ज देखील आपल्याला कमी पैशांत विविध सवलती देत आहे. त्यातच आता जर तुम्ही Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL-MTNL वापरकर्ते असाल तर तुम्हाला या नवीन नियामांबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

सध्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला आहे. दूरसंचार विभागाने (DoT) एक नवीन नियम लागू केला आहे.

नवीन सिम कार्ड खरेदी केल्यानंतर तुमचे सिम कार्ड आधी सक्रिय होईल. सक्रिय झाल्यानंतर ते अवघे २४ तासांसाठी बंद राहिल. यामध्ये आपले इनकमिंग, आउटगोइंग व एसएमएसची सुविधा बंद राहाणार आहे. कंपनीने हे पाउल फसवणुकीच्या वाढत्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी हे केले आहे.

दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच नवीन सिम किंवा ते अपडेट करण्यासाठी त्यांना विनंती देखील केली आहे. हे सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत DoT ग्राहकाची पडताळणी करेल. अशावेळी ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारली तर त्याचे सिम सक्रिय केले जाणार नाही. या सिम कार्डच्या सुविधेमुळे फायदा (Benefits) कसा होईल हे जाणून घ्या.

1. बँकतून ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी

सध्या ग्राहकाच्या वैयक्तिक डेटा चोरीला जाणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या फसवणूकीला बळी न पडण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. सिम कार्डच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. त्याच नवीन सिममधून ओटीटी मिळवून बँकिंग फसवणुकीच्या घटना घडतात.

2. फसवणूक रोखण्यासाठी

देशात डिजिटल (Digital) व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. यासोबतच डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याचे अनेक प्रसंगी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी २४ तासांच्या आत नवीन सिम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT