Green Lake trek in Sikkim saam tv
लाईफस्टाईल

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

Green Lake trek in Sikkim : साहसी पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. उत्तर सिक्कीममधील अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य असा ग्रीन लेक ट्रेक पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

Saam Tv

सिक्कीममधील निसर्गरम्य आणि साहसी पर्यटकांचे आकर्षण असलेला प्रसिद्ध ग्रीन लेक ट्रेक तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. लाचेन झुम्सा आणि खांगरी टूर्स, ट्रेक्स अँड एक्स्पिडिशन्स यांच्या सहकार्याने हा ट्रेक पुन्हा खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सात रशियन ट्रेकर्सनी हा आव्हानात्मक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला.

ग्रीन लेक ट्रेकची वैशिष्ट्य?

समुद्रसपाटीपासून सुमारे ५,०५० मीटर उंचीवर असलेले ग्रीन लेक हे हिमनदीमुळे तयार झालेले सरोवर आहे. कांचनजंगा पर्वत मोहिमांसाठी या ठिकाणाचा बेस कॅम्प म्हणूनही उपयोग केला जातो. या ट्रेकदरम्यान पर्यटकांना बर्फाच्छादित पर्वतशिखरे, हिरवीगार अल्पाइन कुरणे आणि रोडोडेंड्रॉनच्या फुलांनी बहरलेली जंगले पाहण्याची संधी मिळते. ग्रीन लेकच्या स्वच्छ पाण्यासोबतच कांचनजंगा, सिनिओल्चू आणि हिमालयातील इतर उंच पर्वतरांगांचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येते. या परिसरात हिमालयातील दुर्मीळ फुलांसह लाल पांडा आणि हिमबिबट्यासारखे वन्यप्राणी दिसण्याचीही शक्यता असते.

कुठून सुरू होतो हा ट्रेक?

ग्रीन लेक ट्रेकची सुरुवात गंगटोकपासून सुमारे १०७ किलोमीटर अंतरावर असलेल्या लाचेन या शहरातून होते. या संपूर्ण ट्रेकसाठी साधारणतः १० ते १२ दिवसांचा कालावधी लागू शकतो. लांब पल्ल्याचा प्रवास, खडतर डोंगराळ वाटा आणि वाढती उंची यामुळे हा ट्रेक आव्हानात्मक मानला जातो. ट्रेकदरम्यान पर्यटकांना थांगू यांसारख्या जवळच्या छोट्या गावांनाही भेट देता येते.

ट्रेकसाठी जाण्याचा उत्तम काळ कोणता?

ग्रीन लेक ट्रेकचा आनंद घेण्यासाठी एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी उत्तम मानला जातो. या काळात निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येतो. मात्र, हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने पर्यटकांना आवश्यक प्रतिबंधित क्षेत्र परवाना आणि इनर लाइन परमिट घेणे आवश्यक आहे.

ट्रेकला जाण्यापूर्वी अशी करा तयारी

ग्रीन लेक ट्रेक उंचीवर असल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. ट्रेकच्या किमान चार ते सहा आठवडे आधी व्यायामाला सुरुवात करावी. धावणे, सायकलिंग आणि पोहणे यांसारख्या व्यायामांमुळे शरीराची सहनशक्ती वाढण्यास मदत होते.

तसेच शक्य असल्यास ३,००० मीटरपेक्षा अधिक उंचीवरील ठिकाणी पायी चालण्याचा सराव करावा. त्यामुळे कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणाशी शरीर जुळवून घेण्यास मदत होऊ शकते.

ट्रेकदरम्यान उबदार कपडे, वॉटरप्रूफ जॅकेट, मजबूत ट्रेकिंग शूज, प्राथमिक उपचार साहित्य, फोडांवरील उपचारांसाठी आवश्यक वस्तू, वैयक्तिक औषधे आणि पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या सोबत ठेवाव्यात

याशिवाय सुका मेवा, नट्स, एनर्जी बार आणि चॉकलेट यांसारखे ऊर्जादायी पदार्थ जवळ ठेवणे फायदेशीर ठरते. पुरेसे पाणी पिणे, मद्यपान टाळणे आणि कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेणेही महत्त्वाचे आहे.

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेला ग्रीन लेक ट्रेक सिक्कीमच्या साहसी पर्यटनाला नवी चालना देणारा ठरू शकतो. हिमालयातील निसर्गसौंदर्य, आणि ट्रेकिंगचा अनुभव घेऊ इच्छित पर्यटकांसाठी ही एक खास संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मोठी बातमी! मुंबईत सीनीएजीचे दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

UP Election: INDIA आघाडीत धुसफूस? जागावाटपावरून काँग्रेसचा मित्रपक्ष नाराज? अखिलेश यादवांच्या विधानाने चर्चांना उधाण

8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार?

Ind vs NZ : कसोटी मालिकेआधीच भारतीय संघात मोठा बदल; कुलदीप यादवला मायदेशी धाडलं, नव्या खेळाडूची अचानक एन्ट्री

SCROLL FOR NEXT