Baby care, Child care, Parenting tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ लावताय तर जाणून घ्या या गोष्टी

मुलांना काजळ लावताय तर या गोष्टीची काळजी घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : मुलं जन्माला आल्यानंतर आई- आजीपासून सगळेच त्याचे लाड करत असतात. त्याची हवी तशी काळजी देखील घेत असतात.

हे देखील पहा -

लहान मुलांच्या डोळ्यांचे (Eye) सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला घरात डोळ्यांना काजळ लावले जाते. तसेच नजर लागू नये म्हणून डोळ्यांपासून ते गाल हातापायाचे तळवे इथे देखील ते लावले जाते. पण काजळ डोळ्यांत लावल्याने डोळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. पूर्वीच्या काळी लोक मुलांसाठी घरगुती काजळ बनवून त्यांच्या डोळ्यांत लावत असत पण बदलेल्या जीवनशैलीनुसार बाजारात अनेक नवनवीन बँडचे काजळ मिळतात ज्याचा वापर आपण बाळाच्या डोळ्यांसाठी करतो त्यामुळे त्याच्या डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.

काजळात असणाऱ्या रसायनांमुळे लहान मुलांच्या डोळ्यांना संसर्ग तर होतोच परंतु, काजळ लावल्याने मुलांच्या मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होतो. काजळमुळे नुकसान कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. मुले खूप नाजूक असल्यामुळे काजळ लावल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना त्याचा अधिक त्रास होऊ लागतो. काजळ लावल्यानंतर मुले डोळे चोळू लागतात त्यामुळे काजळाचे कण डोळ्यांच्या आतमध्ये पोचतात ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो व त्यामुळे मुलांच्या डोळ्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

काजळात असणारी शिसे मुलांसाठी (Child) खूप धोकादायक आहे. काजळाचा सतत वापर केल्याने शरीरात शिसे जमा होऊ शकतात. काजळाचा दीर्घकाळ वापर केल्याने मुलांच्या शरीरात शिशाचे प्रमाण वाढते, त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर दिसू शकतो. तसेच त्याचा स्नायूंच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात. त्यासाठी मुलांना शिसे असणारे काजळ लावणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT