Shukra Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar 2023 : उलटी गिनती सुरु! या राशींवर मोठं संकट येण्याची शक्यता, सावध राहा

Shukra in Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला संपत्ती, विलास आणि सुखाचा कारक मानले गेले आहे.

कोमल दामुद्रे

Shukra Gochar In Krak Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला संपत्ती, विलास आणि सुखाचा कारक मानले गेले आहे. यावेळी शुक्र प्रतिगामी आहे. शुक्राच्या प्रतिगामी गतीचा प्रत्येकाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे ग्रहांची प्रतिगामी गती ज्योतिषशास्त्रात चांगली मानली जात नाही.

7 ऑगस्ट 2023, उलट्या पावली शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्क राशीत राहील आणि नंतर सिंह राशीत येईल. प्रतिगामी शुक्र कर्क राशीत असताना या ४ राशींच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या लोकांनी सावध राहावे. जाणून घेऊया तुमच्या तुमच्या राशीबद्दल

1. कर्क:

या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. जीवनात (Life) अडचणी येऊ शकतात. नोकरीत सावध राहा. अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतो. घाईघाईने निर्णय घेऊ नका. आदर कमी होऊ शकतो. जोडीदाराशी (Partner) संबंध बिघडू शकतात.

2. सिंह:

शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले म्हणता येणार नाही. या लोकांना धनहानी होऊ शकते. पैसा कुठेतरी अडकू शकतो किंवा गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही आजारावर पैसे (Money) खर्च होऊ शकतात. व्यवहार विचारपूर्वक करा. कोणाशीही वाद होऊ शकतो.

3. कन्या :

वादविवाद आणि राग टाळा, अन्यथा तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागेल. कोणाच्याही सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका.

4. कुंभ :

काही कारणाने अचानक खर्च वाढू शकतो. यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. व्यवसायात उत्पन्नात घट किंवा नफा कमी होण्याचे योग आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याची गरज भासू शकते. अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

SCROLL FOR NEXT