Shravan Shivratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shravan Shivratri 2023 : तब्बल 30 वर्षानंतर श्रावण शिवरात्रीला 'शुभ वृध्दि योग', शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

Shivratri In Shravan Month : श्रावण मास सुरु झाल्यामुळे १५ जुलै ला श्रावण शिवरात्री येत आहे.

कोमल दामुद्रे

Shivratri 2023 : श्रावण हा महिना शंकराला अधिक प्रिय आहे. या महिन्यात शंकराची आराधना केल्यास आपल्याला हवे ते मिळते असे म्हटले जाते. यंदा श्रावण हा २ महिने आहे. उत्तर भारतात श्रावण मास सुरु झाल्यामुळे १५ जुलै ला श्रावण शिवरात्री येत आहे. तर महाराष्ट्रात ही शिवरात्री आषाढ शिवरात्री म्हणून ओळखली जाईल.

यावेळी शिवरात्री या बाबतीत विशेष ठरली आहे कारण त्या दिवशी शुभ वृद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाची पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ मिळते. या दिवशी काही खास उपाय केल्याने तुम्हाला भगवान शंकराची कृपा प्राप्त होऊ शकते.

ज्योतिषांच्या मते शनि प्रदोषाच्या योगायोगामुळे ही शिवरात्री (Shivratri) विशेष असेल. शिवाय यावेळी शिवरात्रीला दोन विशेष योग होत आहेत. तब्बल 30 वर्षांनंतर यावेळी शिवरात्रीला शनिदेवाची विशेष कृपा असेल. शनि (Shani) प्रदोषाच्या योगायोगामुळे या व्रताने संतती प्राप्त होते. अशा योगात उपवास केल्याने संततीची मनोकामना पूर्ण होते. शिवाय ध्रुव योग आणि वृद्धी योगामुळे लाभ होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. करिअर-व्यवसायात प्रगतीसाठी

करिअर (Career) व व्यवसायात प्रगती करायची असेल, तर शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेल्या गंगाजलाने अभिषेक करा. असे मानले जाते की असे केल्याने काम आणि व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

2. या गोष्टी दान करा

आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात जव मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे. तसेच जव आणि गहू गरजूंना दान करा. भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण करावेत.

3. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी

मेहनत करुनही आर्थिक संकट सतावत असेल तर श्रावण मासात ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. दूध, दही, मध आणि तुपापासून पंचामृत तयार करून शिवलिंगाला अर्पण करा. तसेच शंकराच्या पिंडीवर धतुरा आणि बेलपत्र अर्पण करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT