Nag Panchami 2023 Date Saam tv
लाईफस्टाईल

Nag Panchami 2023 Date: नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व पूजा पद्धत

Nag Panchami 2023 Information in Marathi : प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला नाग देवतेची पूजा केली जाते, परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला नामपंचमी म्हणतात.

कोमल दामुद्रे

Know About Nag Panchami 2023 Tithi, Shubh Muhurat, Puja Vidhi in Marathi:

श्रावण महिना म्हटलं की, सगळीकडे हिरवीगार नटलेली वनराई, ऊन आणि पावसाचे वातावरण आणि अनेक सणांचा महिना. श्रावण महिना म्हटलं की, सणाची सुरुवात होते.

या महिन्यातला पहिला सण येतो तो नागपंचमी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 रोजी सोमवारी साजरी केली जाईल . प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला नाग देवतेची पूजा केली जाते, परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला नामपंचमी म्हणतात. या दिवशी नाग देवता किंवा नागाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

1. नागपंचमी तिथी व मुहूर्त

  • नागपंचमीची तारीख 21 ऑगस्ट 2023, सोमवार 12:20 मिनिटांनी असेल,

  • नागपंचमीची तारीख 22 ऑगस्ट 2023, मंगळवारी दुपारी 2:00 वाजता संपेल.

  • नागपंचमी पूजा मुहूर्त - सकाळी 5:53 ते 8:30 पर्यंत

2. नागपंचमी महत्त्व

श्रावण (Shravan) महिन्यात नागांच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात भगवान शंकराच्या लाडक्या नागाचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास धनात वृद्धी होते, असे मानले जाते.

3. नागपंचमी उपाय

जर एखाद्या व्यक्तीला काल सर्प दोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी वाहत्या नदीत चांदीच्या नागाची जोडी तरंगवावी किंवा एखाद्याला दान करावी, असे केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव संपतो. नागपंचमीच्या दिवशी पूजा (Puja) करणाऱ्या व्यक्तीला कधीच साप किंवा सर्पदंशाची भीती वाटत नाही असे मानले जाते.

4. नागपंचमीला काय करावे ?

  • नागपंचमीच्या दिवशी नागाला दुधाने स्नान घालून नागाची पूजा करावी.

  • या दिवशी सापाला दूध (Milk) पाजण्याचाही विधी आहे.

  • या दिवशी नागदेवतेला रोळी, चंदन, हळद, फुले, दिवा अर्पण करा.

  • पूजेनंतर नागदेवतेची आरती करावी.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT