Shardiya Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? या गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा येईल मोठं संकट

Shardiya Navratri Vrat Date 2023 : आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Things To Rember on Navratri:

लवकरच नवरात्रौत्सव सर्वत्र सुरु होईल. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.

९ दिवसांच्या या काळात दुर्गादेवीची विशेष पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत साजारा केला जाणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या विविध रुपांचे दर्शन होते. नवरात्रीच्या या काळात अनेक भक्तगण दुर्गादेवीचा व्रत करतात. या काळात आपल्याकडून अनेक छोट्या छोट्या चुका होतात ज्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते.

नवरात्रीचा उपवास (Vrat) जर तुम्ही देखील करत असाल तर काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या शिवाय नवरात्रीत काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. कलश स्थापना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसविला जातो. अर्थात कलश स्थापना होते. त्यानंतर ९ दिवस दुर्गा देवीची (Durga devi) पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना करावी.

2. अखंड ज्योत प्रज्वलित करा

शारदीय नवरात्रीचे (Navratri) व्रत करत असाल किंवा घरात घट बसवत असाल तर अखंड ज्योत तेवत ठेवायला हवी. अशी धार्मिक श्रद्धा आहे. दररोज अखंड ज्योत प्रज्वलित असेल तर दुर्गा देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते असे म्हटले जाते.

3. ही गोष्ट अर्पण करा

नवरात्रीचा उपवास ९ दिवस ठेवला जातो ज्यामध्ये देवीच्या ९ वेगवेगळ्या रुपांचे दर्शन होते. तसेच या काळात दूर्गा देवीला लाल वस्त्र अर्पण करावे. असे केल्याने दुर्गा देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

4. या गोष्टींकडे लक्ष द्या

नवरात्रीच्या काळात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नवरात्रीच्या काळात घराची स्वच्छता करायला हवी. तसेच या दिवसात कांदा-लसणाचे पदार्थ खाऊ नये. नारळ-लिंबू यांसारख्या गोष्टींचा आहारात वापर करु नये.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT