Navratri 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri 2023 : नवदुर्गेच पहिलं शक्तीपीठ पाकिस्तानात; नवरात्रीत या ठिकाणी इतर भाविकांसह मुस्लिम बांधवही करतात पूजा

Navratri 2023 Hinglaj Mata Mandir: हिंगलाजला हिंगुळा असे देखील म्हणतात, तसेच याला काटेरी शक्तीपीठही म्हटले जाते.

कोमल दामुद्रे

Shaktipeeth in Pakistan:

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. विविध भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्साह सुरु होणार आहे.

यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. या दहा दिवसात दुर्गा देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिलं शक्तीपीठ कोणते याबाबत आजही अनेकांना माहित नाही. ते शक्तीपीठ कुठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? जाणून घेऊया.

1. पाकिस्तानात दुर्गा देवीचं पहिलं शक्तीपीठ

दुर्गादेवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी पहिलं शक्तीपीठ हे पाकिस्तानातील हिंगलाजमध्ये आहे. याला हिंगलाजचे सिद्धपीठ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रातांत हिंगोल नदीच्या काठावर आहे. हा भाग पाकिस्तान आणि अफागणिस्तानच्या सीमेवर असून येथील छोट्या गुहेत देवीची पूजा केली जाते. हिंगलाजला हिंगुळा असे देखील म्हणतात, तसेच याला काटेरी शक्तीपीठही म्हटले जाते.

2. मुस्लिम बांधवही करतात पूजा

हिंदू धर्मात याला शक्तीपीठ (Shaktipeeth) म्हणतात तर मुस्लिम बांधव याला 'नाना का हज' असे म्हणतात. येथील मुस्लिम बांधवांची हिंगलाज मातेवर विशेष श्रद्धा आहे. तसेच या मंदिराचे व्यवस्थापन समिती ही हिंदू आणि मुस्लिम दोघांकडे आहे.

3. प्रथम शक्तीपीठ कसे?

धार्मिक मान्यतेनुसार सतयुगात देवी सतीने आपला देह अग्निकुंडात अर्पण केल्यानंतर भगवान शंकराने (Shiv) सतीचे शरीर घेऊन तांडव केला. त्यानंतर भगवान विष्णुंनी शंकराला शांत करण्यासाठी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. त्यातील एका शरीराचा भाग हा पाकिस्तानातील अघोर पर्वतावर पडला ज्यामुळे येथे पहिलं शक्तीपीठ तयार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT