Guru Pushya Yog 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Guru Pushya Yog 2024 : पौष पौर्णिमा, गुरुपुष्यामृतयोगाच्या शुभ संयोगामुळे या ५ राशींचे नशीब फळफळणार, व्यापारात होईल वाढ

Paush Purnima 2024: आज शांकभरी पौर्णिमा अर्थात पौष पौर्णिमा आहे. नवरात्रीचा उत्सव संपला असून चंद्र स्व: राशीत संक्रमण करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असते.

कोमल दामुद्रे

Shakambhari Purnima :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असते. अशातच आज शांकभरी पौर्णिमा अर्थात पौष पौर्णिमा आहे. नवरात्रीचा उत्सव संपला असून चंद्र स्व: राशीत संक्रमण करत आहेत.

चंद्राच्या कर्क राशीत संक्रमणामुळे गुरुपुष्यामृताचा महायोगाचा शुभ संयोग तयार झाला आहे. तसेच प्रीति योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने ५ राशींना अधिक फायदा (Benefits) होणार आहे. अनेकजण नवीन व्यवसाय (Business) सुरु करु शकतात. तसेच धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत.

1. मेष

जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून चांगला नफा होईल. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींमधून सुटका होईल. नोकरी (Job) बदलण्याचा विचार कराल.

2. कर्क

आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. कामातही यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी लाभ होईल. वडिलांची साथ मिळेल.

3. वृश्चिक

उत्पन्नात वाढ होईल. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल. भविष्यात चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होतील.

4. मकर

सकारात्मक वातावरणामुळे आजूबाजूचे वातावरण चांगले राहिल. जीवनाच्या विविध क्षेत्रात बुद्धिमत्ता आणि हुशारीचा लाभ मिळेल. व्यापारातील समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम वाढेल.

5. मीन

अनपेक्षित लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी कौतुकांचा वर्षाव होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. वडिलांच्या मदतीने अनेक प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT