Universal Vaccine For Infection saam tv
लाईफस्टाईल

Nasal spray vaccine: एक स्प्रे करणार सर्व व्हायरल इन्फेक्शनचा खात्मा; शास्त्रज्ञांची तयार केली नवी लस

Universal Vaccine For Infection: फ्लू, कोविड-१९, सामान्य सर्दी, बॅक्टेरियल संसर्ग आणि अ‍ॅलर्जीपासून संरक्षण देणारी नवीन नेजल स्प्रे लस शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दरवर्षी सर्दी, फ्लू, बॅक्टेरियल न्यूमोनिया आणि अ‍ॅलर्जी सारखे अनेक श्वसनाचे लाखो लोकांना जाणवतात. भारतात प्रदूषण, धूळ आणि हवामानातील बदल सामान्य असल्याने देशात ही समस्या आणखी गंभीर मानली जाते. मात्र आता शास्त्रज्ज्ञांनी एक लस शोधून काढलीये. यामध्ये लसीचा स्प्रे एकाच वेळी या सर्व इन्फेक्शनपासून संरक्षण देणार आहे.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतील संशोधकांनी एक नवीन लस फॉर्म्युला विकसित केलाय. हा अभ्यास जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा नेसल स्प्रे विविध बॅक्टेरिया आणि अगदी अ‍ॅलर्जीपासूनही संरक्षण देऊ शकणार आहे.

या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर बाली पुलेंद्रन (पीएचडी) यांनी स्पष्ट केलंय की, ही लस फ्लू, कोविड-१९, सामान्य सर्दी, बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जींपासून संरक्षण करणार आहे.

काय आहे या लसीची खासियत?

यापूर्वी वापरण्यात आलेल्या सामान्य लसी शरीराला गोवर किंवा कांजण्यांसारख्या विशिष्ट आजारापासून प्रशिक्षित करतात. ही नवीन लस वेगळ्या पद्धतीने काम करते. ती थेट रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित करत नाही तर फुफ्फुसातील पांढऱ्या रक्त पेशी एक्टिव्ह करते. शास्त्रज्ञांनी याला अंबर अलर्ट म्हटलंय. म्हणजेच शरीर कोणत्याही हल्ल्यासाठी आधीच तयार असणं. ही लस नाकात स्प्रेच्या स्वरूपात दिली जाते जी थेट श्वसनसंस्थेपर्यंत पोहोचते आणि फुफ्फुसांच्या सिस्टिमला बळकटी देते.

अभ्यासातून काय समोर आलं?

हा अभ्यास पहिल्यांदा उंदरांवर करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर केलेल्या चाचणीतून असं दिसून आलं की, ही लस SARS-CoV-2 आणि इतर कोरोना व्हायरसपासून संरक्षण देते. ही स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि अ‍ॅसिनेटोबॅक्टर बौमनी सारख्या बॅक्टेरियापासून देखील संरक्षण करते. यामुळे घरातील धुळीच्या माइट्सवरील ऍलर्जीची प्रतिक्रिया देखील कमी झाल्याचं पाहायला मिळालं. हे संरक्षण सुमारे तीन महिने टिकू शकतं.

याचा अर्थ असा की कोणतही इन्फेक्शन फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकत नव्हतं. जरी काही बॅक्टेरिया आत शिरले तरी शरीर त्यांच्याशी लढा देण्यासाठी तयार असायचं. या चाचण्या सध्या उंदरांपुरता मर्यादित आहेत. अजून मानवांवर या चाचण्या करायच्या आहेत.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, य़ा लसीचा परिणाम लोकांमध्ये किती काळ राहू शकेल याची अजून माहिती नाही. ही लस खोलवर पोहोचवण्यासाठी नेब्युलायझरची आवश्यकता असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT