Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : 'या' 4 गोष्टींवरुन कळेल तुमचा पार्टनर रिलेशनशिपमध्ये इंटरेस्टेड आहे की नाही?

प्रेम किंवा वैवाहिक जीवन जगणारे आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवतात.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : प्रेम असो किंवा मैत्री हल्ली प्रत्येक नात्यात भांडणं ही असतात पण ती भांडण किती टोकाला घेऊन जायची हा देखील प्रश्न असतो. प्रेम किंवा वैवाहिक जीवन जगणारे आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवतात. अशा नात्याचा पाया एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, आदर आणि काळजी यावर अवलंबून असतो.

जिथे प्रेम आहे, तिथे संघर्ष देखील आहे आणि हा देखील प्रेमाचा एक पैलू मानला जातो. पण हे भांडण खूप वाढले तर नात्यात दुरावा यायला वेळ लागत नाही. नात्यात काही बिघाड होऊनही अनेक जोडप्यांना एकत्र राहण्यास भाग पाडले जाते. एकत्र असतानाही ते एकत्र नसतात.

परंतु, तुम्हाला माहित आहे का? काही चिन्हे सांगतात की, तुमचा पार्टनर एकत्र राहूनही तो तुमच्या सोबत राहण्यास इंटरेस्टेड आहे की, नाही. या लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष केल्यास नातेसंबंध अडचणी येऊ शकतात. व्हॅलेंटाईन डे च्या आधी या चिन्हे जाणून घ्या आणि तुमच्या नात्यातील (Relationship) गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा.

1. सतत दुर्लक्ष करणे

नात्यात भांडणे होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु काही परिस्थिती अशा देखील उद्भवतात ज्यामुळे जोडीदारांच्या मनात कटुता येते आणि ती सहजासहजी दूर होत नाही. आजच्या काळात स्त्रिया किंवा पुरुष आपल्या जोडीदाराकडे (Partner) दुर्लक्ष करण्यासाठी स्मार्ट फोनसारख्या गोष्टींचा अधिक वापर करतात. स्मार्ट फोनमुळे आपले जीवन सोपे झाले आहे पण त्याचे तोटेही आहेत. सतत फोन वापरणे हे तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचे लक्षण असू शकते.

2. काळजी करणे

जरी स्वतःची काळजी घेणे चांगले आहे, परंतु नातेसंबंधात जोडीदाराच्या काळजीच्या बाबतीत एकमेकांवर अवलंबून असतात. जर आपल्या जोडीदाराने आपली काळजी करण्याचे सोडून दिले तर, ते नातेसंबंधात सर्व काही ठीक नाही हे देखील लक्षण मानले जाते.

Couple

3. प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडणे

प्रेम किंवा वैवाहिक (Marriage) जीवनात भांडण होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु जर तुमच्या दोघांमध्ये प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडण होत असेल तर ते तुमच्या नात्यासाठी मोठा धोका आहे. गोष्टी तुटण्यापूर्वी त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.

4. अंतर ठेवणे

नात्यात एकमेकांची जागा जपली पाहिजे हे खरे आहे, पण जेव्हा गोष्टी योग्य नसतात तेव्हा जोडपे (couple) एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जोडीदार एकत्र राहूनही सोबत नसतो हे खरे ठरते. यामुळे नातेसंबंधात सर्वकाही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT