Reasons Of Divorce saam Tv
लाईफस्टाईल

Reasons Of Divorce : लग्न का तुटते ? घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे ? जया किशोरीने दिला जोडीदारासोबत सुखी राहण्याचा मंत्र

What is the main reason of marriage fails In India: अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज. नात्यात एकदा खटके उडू लागले की, त्यात टोकाची भूमिका घेतली जाते.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : लग्न झाल्यानंतर बरेचदा नात्यात अनेक अडचणी येतात ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रासही सहन करावा लागतो. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज. नात्यात एकदा खटके उडू लागले की, त्यात टोकाची भूमिका घेतली जाते.

असं म्हटलं जातं की, लग्नाच्या गाठी या साक्षात ब्रम्हदेव स्वर्गातून बांधतात. पण आजच्या काळात या गाठी तुटण्यासाठी एक कागदाचा तुकडा पुरेसा असतो. गेल्या काही वर्षात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळाले आहे. सर्व्हेक्षणानुसार घटस्फोटाचे प्रमाण हे भारतात (India) जास्त प्रमाणात वाढले आहे.

परंतु, नाते का तुटते ? यामागचे कारण काय ? घरचे व नातेवाईक अनेक प्रकारे हे नातं तुटू नये म्हणून प्रयत्न करत असतात. परंतु, मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने तिच्या इंस्टा अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सांगितले की, लग्न (marriage) का तुटते ? जोडीदारासोबतचा प्रवास दिवसेंदिवस अधिक नकोसा का वाटतो. नातं हव हवसं वाटतं पण त्यात असणाऱ्या तक्रारींमुळे त्या नात्याचा बळी दिला जातो. त्यांनी सांगितले नात्यात आनंदी राहण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी

1. लग्न का तुटते ?

लग्न हे जेव्हा नातं (Relationship) जुळवण्याऐवजी त्यांच्या तडजोडीवर विचार केला तर त्यात वेगळेपणा निर्माण होतो. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेली तडजोड असेल. जोडीदाराकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यास त्याच्या बद्दल असणारे प्रेम कमी होत जाते व नातं तुटते.

2. अॅडजस्टमेंट करायला शिका

नको असलेल्या गोष्टीतही आपल्याला अॅडजस्टमेंट करता यायला हवी. आपल्या सुखाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नात्यात आपल्या जोडीदाराला सुखी पाहण्यासाठी अॅडजस्टमेंट करणे देखील गरजेचे आहे. जर तुम्हाला नात्यात अॅडजस्टमेंट करता येत नसेल तर तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल सांगा. त्यामुळे तुम्हाला असणारी अस्वस्थता देखील निघून जाईल व नाते फुलण्यास अधिक मदत होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT