Realme Phone Realme Phone website
लाईफस्टाईल

Realme Phone : 'चीयर्स फॉर रियल' टॅगसह लवकरच लॉन्च होणार Realme चा Coca Cola Phone, जाणून घ्या फीचर्स व किंमत

Realme India च्या वेबसाइटवर Coca-Cola fizz चा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

कोमल दामुद्रे

Realme Phone : Realme लवकरच भारतात कोका कोला फोन लॉन्च करू शकते, जे स्वतः Realme च्या अधिकृत वेबसाइटने सूचित केले आहे. Realme India च्या वेबसाइटवर Coca-Cola fizz चा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

यासोबतच चीयर्स फॉर रियल टॅग लाईन देखील वापरण्यात आली आहे, ज्यामध्ये कोक दर्शविला आहे. यानंतर, आणखी टीझर बाहेर येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माने कोका-कोला स्मार्टफोनचे रेंडर ट्विट केले होते.

हा Realme स्मार्टफोन (Smartphone) या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस म्हणजेच मार्क लाँच केला जाऊ शकतो. आतापर्यंत कंपनीने सॉफ्ट ड्रिंक ब्रँडशी सहकार्य करण्याबद्दल बोललेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे की ही Realme 10 4G ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. कोकोकोलाच्या या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरे दिसतील.

1. Realme 10 4G चे Specification

  • Realme 10 4G आधीच नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाला आहे.

  • या मोबाईलमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल असेल.

  • त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आहे.

  • या फोनमध्ये Mediatek Helio G99 चिपसेट वापरण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

  • हा स्मार्टफोन Realme UI 3.0 वर काम करतो, जो Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो.

2. कॅमेरा सेटअप

  • या आगामी स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा (Camera) सेटअप आहे.

  • यात 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेराचा दुय्यम कॅमेरा आहे.

  • डिस्प्लेच्या डाव्या बाजूला एक पंच होल दिसेल, ज्यामध्ये 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

3. किंमत

  • या आगामी Realme स्मार्टफोनची किंमत (Price) 13999 रुपये पासून सुरु होऊ शकते.

  • ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज उपलब्ध असेल.

  • कोकोकोला सह हा फोन Realme 10 4G च्या तुलनेत किती असेल आणि त्याची किंमत किती बदलेल हे अद्याप सांगता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी, पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT