Raksha Bandhan (संग्रहित छायाचित्र) yandex
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला दुर्मिळ योगायोग, 'ब्लू मून'चा अप्रतिम नजारा दिसणार!

Raksha Bandhan 2024 : यंदाचा रक्षाबंधन सण खूप खास असणार आहे. कारण, या दिवशी अनेक शुभ योगायोग जुळून आलेत. त्याशिवाय रक्षाबंधनाला आकाशात 'ब्लू मून'चा अप्रतिम नजाराही पाहायला मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Raksha Bandhan 2024: ज्योतिष शास्त्रानुसार यंदाचा रक्षाबंधन सण खूप खास असणार आहे. कारण, या दिवशी अनेक शुभ योगायोग जुळून आलेत. त्याशिवाय रक्षाबंधनाला आकाशात 'ब्लू मून'चा अप्रतिम नजाराही पाहायला मिळणार आहे.

विशेष योगायोगांमुळे काही राशींचे भाग्य रक्षाबंधनाच्या दिवसापासून चमकणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमाही साजरी केली जाईल. यावेळी 19 ऑगस्ट रोजी भावा-बहिणींचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा होणार आहे.

काय असतो 'ब्लू मून'?

जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. या स्थितीत चंद्र पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक उजळ दिसतो. आणि जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून असे म्हणतात.

त्या दिवशी चंद्र निळा का दिसतो?

ब्लू मून हे नाव ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो की, ब्लू मून झाल्यास चंद्राचा रंग निळा असतो का? त्याला ब्लू मून का म्हणतात?

ब्लू मून झाल्यास चंद्राचा रंग निळा नसतो, या दिवशीही चंद्र त्याच नैसर्गिक रंगात असतो, फक्त या दिवशी चंद्र मोठ्या आकारात असतो आणि अधिक तेजस्वी असतो. त्यामुले त्या दिवशीच्या चंद्राला ब्लू मून म्हटले जाते. कारण ही एक दुर्मिळ घटना आहे, तिचे नाव कॅलेंडरनुसार ठेवण्यात आले आहे.

आकाशात कधी दिसतो ब्लू मून

19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी 6:56 वाजता चंद्रोदय होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रास्त होईल. रात्री 11:55 वाजता चंद्र शिखरावर असेल. त्याच दिवशी सायंकाळी ६:५९ वाजता चंद्र मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल. काही राशींसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे.

दुर्मिळ योगायोग -

रक्षाबंधन, ब्लू मून सोमवारी आहे. योगायोग म्हणजे, त्यादिवशी श्रावण सोमवारही आहे. या दिवशी शश राजयोग, बुद्धादित्य राजयोग, लक्ष्मी-नारायण राजयोग, विष राजयोग, कुबेर योग यांसारख्या दुर्मिळ संयोग तयार होत आहे. म्हणून हे रक्षाबंधन अतिशय विशेष मानले जात आहे. मेष, सिंह, धनु, मकर, कुंभ व मीन या राशीच्या लोकांसाठी हे रक्षाबंधन खास आणि लाभदायक असेल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते आणि पगारही वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT