लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024: ९० वर्षांनंतर आलाय योग, पण त्यावर ८ तास भद्राचं सावट; राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी?

Raksha Bandhan Shubh Muhurt: यंदा रक्षाबंधनला भद्राचं सावट असल्यामुळे भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणात विविध सण-उत्सव असतात. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून दिर्घायुष्य लाभावे यासाठी औक्षण करते. मात्र यंदा रक्षाबंधनला भद्राचं सावट असल्यामुळे रक्षाबंधन कधी साजरा करावा असा प्रश्न सर्वांनाच होत आहे.

यंदा कधी आहे रक्षाबंधन?

हिंदू पचांगानुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षा रक्षाबंधन पौर्णिमा १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३.०४ वाजता सुरू होणार असून रात्री ११.५५ समाप्त होईल.

रक्षाबंधन भद्रा काल मुहूर्त

रक्षाबंधन पौर्णिमेच्या प्रारंभाला सकाळी ५.५३ पासून भद्रा काल सुरू होणार असून दुपारी १.३२ समाप्त होईल. म्हणजेच यावर्षी ८ तास भद्राची सावली असेल. ज्यामध्ये राखी बांधली जाणार नाही. भद्राकाळात भावाच्या मनगटावर राखी बांधणे अशुभ मानले जाते.

रक्षाबंधन ६ शुभ संयोग

यावर्षी रक्षाबंधन हा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर आहे. रक्षाबंधन हा सण श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आल्याने यावर्षी राजपंचक, श्रावण पौर्णिमा, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, शोभन योग आहेत. तसेच या दिवशी ग्रह- नक्षत्रांचे शुभ राजयोग देखील असणार आहेत.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

पंचागानुसार, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी १९ ऑगस्ट हा ब्रम्ह मुहूर्त असेल. या दिवशी दुपारी १.३२ ते रात्री ९.०८ पर्यंत ब्रम्ह मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT