Prostate Cancer In Men Know the Signs in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Prostate Cancer Symptoms: पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कॅन्सरचा धोका? ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला

Prostate Cancer In Men Know the Signs in Marathi: अनेकांना प्रोस्टेट कॅन्सरविषयी माहिती नाही. हा कॅन्सर साधारणत: पुरुषांना होतो. पुरुषांच्या प्रोस्टेटमध्ये होणारा हा आजार आहे.

कोमल दामुद्रे

Prostate Cancer Signs:

कर्करोग हा गंभीर आजार असून त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. सध्या भारतात कर्करोगाचे अनेक रुग्ण पाहायला मिळाले आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्याविषयी आपल्याला फरासे माहित नाही.

अनेकांना प्रोस्टेट कॅन्सरविषयी माहिती नाही. हा कॅन्सर साधारणत: पुरुषांना होतो. पुरुषांच्या प्रोस्टेटमध्ये होणारा हा आजार (Disease) आहे. ज्यावेळी पुरुषांच्या पौरुष ग्रंथीमध्ये पेशी अधिक वाढतात. तेव्हा हा कर्करोग (Cancer) होतो.

प्रोस्टेट कर्करोग हा हळूहळू विकसित होतो आणि याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. लक्षणे निदान होईपर्यंत हा अधिक गंभीर स्वरुपाचा होतो. प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु, वेळीच निदान झाल्याने त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात. याची लक्षणे (Symptoms) कशी कोणती जाणून घेऊया

जर तुमच्या लघवीचा रंग बदलल्यासारखा वाटतोय. वारंवार लघवी होतेय किंवा लघवीतून रक्त येणं किंवा जळजळ होत असेल, तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण आता सांगितलेल्या लक्षणांपैकी बहुतांश लक्षणं ही प्रोस्टेट कॅन्सरची असू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलंय.

गेल्या काही काळात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढलाय. तशी आकडेवारीही समोर आली आहे. टाटा रुग्णालयाच्या रेडिएशन आणि युरो ऑन्कोलॉजी प्रा. डॉ. वेदांग मुर्ती यांच्या म्हणण्यानुसार, टाटा रुग्णालयात वर्षाला ८०० ते १००० रुग्ण उपचारांसाठी येतात. तर भारतात आतापर्यंत ३४ हजार ५४० रुग्णांची नोंद झालीये. तर त्यापैकी १६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.

1. आता प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कसा वाढतो?

नायर रुग्णालयाच्या एँड्रोलॉजी विभागाच्या डॉ. प्रियांका कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार आनुवांशिकतेमुळे होण्याचा जास्त धोका असतो. तसेच लठ्ठपणा, वेळेवर न जेवणे किंवा जंक फूडचे सेवन करणे ही या आजाराची लक्षणे असू शकतात. त्यामुळे दर दोन वर्षांनी यासंबंधीत तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT