Pregnancy Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Tips : आई होण्याच्या काळात पुरुषांनी करावी 'ही' कामे, बाळ देखील होईल खुश !

जर तुमची पत्नी देखील गर्भवती असेल तर तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की गर्भधारणेदरम्यान महिलांना कसे वाटते.

कोमल दामुद्रे

Pregnancy Tips : मातृत्व होण्याच सुख प्रत्येक स्त्रीला हवं असते. या टप्प्यातून बऱ्य़ाच महिला जातात. या काळात होणारे बदल कधी कधी कळत नाही तर कधी तरी अधिक अवघड असतात.

या परिस्थितीत अधिक चिडचिड होते, शारीरिक व मानसिक स्थितीत बदल होत असतात. ज्याचा परिणाम आपल्या बाळावर होत असतो. हा टप्पा जितका महिलांसाठी त्रासदायक असतो तितकाच तो पुरुषांसाठी देखील असतो.

ही परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना समजत नाही. या काळात पुरुषांनाही अनेक प्रश्न पडतात, त्यांना जाणून घ्यायचे असते की यावेळी ते आपल्या पत्नीला कशी मदत करू शकतात.

जर तुमची पत्नी देखील गर्भवती असेल तर तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की गर्भधारणेदरम्यान महिलांना कसे वाटते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात.

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरशी या सर्व पैलूंबद्दल बोलू शकता जेणेकरून या काळात तुमचा पती पूर्णपणे चिंतामुक्त होऊन या कालावधीचा आनंद घेऊ शकेल.

१. सतत भूक लागणे -

गर्भधारणेदरम्यान महिलांना जास्त भूक लागते अशावेळी पुरुषांनी (Mens) समजून घेतले पाहिजे. यादिवसांत बाळाची हळूहळू वाढ होत असते. त्यामुळे सतत खाण्याची इच्छा होत असते. त्यावेळी ती कोणत्याही वेळी काहीही खाण्यास मागू शकते ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे समजवून सांगा व शक्य होत असल्यास ते मागणी पूर्ण करा

२. त्यांच्यावर विनोद करू नका -

काही महिलांना गरोदरपणात खूप विचित्र पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा विचित्र गोष्टी ऐकून पुरुषांना थोडे आश्चर्य वाटते. त्यामुळे पुरुषांनी हे लक्षात ठेवावे की गरोदरपणात त्यांना विचित्र गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल तर, यात चेष्टा करण्यासारखे काही नाही.

३. लठ्ठपणा -

गर्भधारणा हा एक असा टप्पा आहे जिथे स्त्रियांमध्ये अनेक हार्मोन्सचे बदल होत असतात. यावेळी महिलांचे वजन वाढणे अगदी सामान्य आहे. जर तुम्ही तुमच्या बायकोच्या वाढत्या वजनाबद्दल बोललात तर कदाचित तुमच्या पत्नीला वाईट वाटेल. त्यामुळे गरोदरपणात वाढलेल्या वजनाची चेष्टा करू नका.

४. मूड बदलणे -

गरोदरपणात (Pregnancy) आणि प्रसूतीनंतरही महिलांचा मूड बदलतो. यात महिलांचा दोष नाही हे समजून घ्यायला हवे. हा एक टप्पा आहे ज्यातून सर्व महिला जातात. अशावेळी त्याची होणारी चिडचिड समजून घ्या. त्यांना काय हवे नको ते पहा. ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल.

५. कामात मदत करते -

या काळात स्त्रियांनी अधिक काम करु नये किंवा सतत उठ बस करु नये असे सांगितले जाते. वाढत्या वजनामुळे या सगळ्या गोष्टी करणे कठीण होते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना घरातील छोट्या कामात मदत केली पाहिजे. या काळात पत्नीला जास्तीत जास्त विश्रांती देण्याचा प्रयत्न करा.

६. झोपेची काळजी घ्या -

गरोदरपणात महिलांनाही जास्त झोप लागते. जर तुमची पत्नी थकल्यासारखे वाटत असेल किंवा तिला कधीही झोपायचे असेल तर तिला विश्रांती द्या. तुम्ही हे लक्षात ठेवावे की या काळात महिलांना पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT