“Growing trend of pre-wedding weight loss injections raises serious health concerns among young women.” saam tv
लाईफस्टाईल

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

Pre-Wedding Weight Loss Mounjaro Risk India: झटपट श्रीमंतीसोबत आता झटपट वजन कमी करण्याचा ट्रेंड सध्या समाजात वाढताना दिसतोय. सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. अशातच बाजारात लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध आलंय? होय तुम्ही बरोबर ऐकलंत... नेमकं हे प्रकरण काय आहे? मुली वजन घटवण्यासाठी काय करतायत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

लग्नाचा दिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा! या दिवशी आपण सर्वात सुंदर दिसावं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण 'सुंदर' दिसण्याच्या नादात जर तुम्ही तुमच्या आयुष्याशीच खेळ करत असाल तर? सध्या तरुणाईमध्ये लग्नाआधी झटपट वजन कमी करण्यासाठी एका इंजेक्शनची मोठी क्रेझ पाहायला मिळतेय.... ते इंजेक्शन आहे... मौनजारो....लग्नाआधी झटपट वजन कमी करण्यासाठी तरुणाई या मौनजारो नावाचं इंजेक्शनचा वापर करतेय... मात्र, वजन कमी करणाऱ्या मौनजारो इंजेक्शनचा वापर नेमका कशासाठी केला जातो पाहूयात...

मौनजारो हे टाईप 2 मधुमेहाच्या उपचारासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे एक इंजेक्शन आहे.

यामध्ये टिरझेपाटाइड नावाचा सक्रिय घटक शरीरातील GLP-1 या संप्रेरकाला सक्रिय करते.

ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि भूक कमी लागते.

मौनजारोचा वापर टाईप 2 मधुमेह नियंत्रित ठेवून लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो.

मौनजारो हे औषध शरीरातील चयापचय क्रिया बदलते. मात्र, ज्यांना मधुमेह नाही, अशा व्यक्तींनी केवळ सौंदर्यासाठी याचा वापर करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे स्वादुपिंडावर सूज येणे , किडनीचे विकार आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

धक्कादायक म्हणजे, सध्या बाजारात लग्नानिमित्त 'विवाहपूर्व वेट लॉस पॅकेजेस'ची जाहिरात केली जातेय... यात मौनजारोचा सर्रास वापर होतोय. एका अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारतातील लठ्ठपणावरील औषधांची बाजारपेठ तब्बल 860 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचणार आहे. हा आकडा जेवढा मोठा आहे, तेवढाच तो चिंतेचाही आहे. कारण, कमी वेळेत आणि शारिरीक मेहनत न घेता सडपातळ होण्याचा शॉर्टकट तुमच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. त्यामुळे लग्नातील काही तासांचा 'दिखावा' तुमच्या उर्वरित आयुष्यापेक्षा मोठा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती! पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार?

SCROLL FOR NEXT