Pre-wedding Photoshoot Saam Tv
लाईफस्टाईल

Pre-wedding Photoshoot : कमी खर्चात प्री-वेडिंग शूट करायचे आहे ? मुंबईतील 'या' रोमँटिक ठिकाणांना भेट द्या

मुंबईतील अशा काही जागा आहेत जेथे तुम्ही सुंदर व कमी खर्चात हवे तसे फोटोशूट करु शकतात.

कोमल दामुद्रे

Pre-wedding Photoshoot : हल्लीच्या प्रत्येत तरुण जोडप्याला प्री-वेडिंग फोटोशूट करायचे असते. आपल्या लग्नापूर्वीच्या सुंदर आठवणी जपायला कोणाला नाही आवडणार. परंतु, वेळेअभावी व कमी खर्चात फोटोशूट करण्याची इच्छा प्रत्येकाला असते.

मुंबईतील (Mumbai) अशा काही जागा आहेत जेथे तुम्ही सुंदर व कमी खर्चात हवे तसे फोटोशूट करु शकतात. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मरीन ड्राइव्ह

Marine Drive

प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी मरीन ड्राइव्ह हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. मुंबईत प्री-वेडिंग फोटोशूटसाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. तुम्हाला समुद्राच्या तुमच्या रोमँटिक फोटोशूटमध्ये टिपायच्या असतील तर प्री-वेडिंग शूटसाठी ही जागा खास आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी, आपण कॅमेऱ्यात सर्वोत्तम छायाचित्रांपैकी एक कॅप्चर करू शकता. याशिवाय रात्रीच्या लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशातही तुम्ही फोटो काढू शकता. तसेच तुम्ही गेटवे ऑफ मुंबई आणि ताज पॅलेस समोर फोटोशूट देखील करू शकता.

2. वसई किल्ला

Vasai Fort

जर तुम्हाला ऐतिहासिक फोटोशूट करायचे असेल तर प्री-वेडिंगसाठी तुम्ही वसईचा किल्ल्याला भेट देऊ शकतात. वसईचा किल्ला असे ठिकाण आहे जिथे केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कपल्स फोटोशूट करण्यासाठी येतात. या किल्ल्यात फोटो (Photo) काढण्याबरोबरच किल्ल्याच्या आजूबाजूच्या हिरवाईत फोटोशूटही करता येते. वसई किल्ल्याशिवाय वसई बीज देखील सुंदर छायाचित्रांमध्ये टिपता येते.

3. वांद्रे-वरळी सी लिंक

Bandra-worli Sealink

मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेले वांद्रे-वरळी सी लिंक हे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी रोमँटिक ठिकाणापेक्षा कमी नाही. एका बाजूला वरळी सी लिंक आणि दुसऱ्या बाजूला बॉलीवूड चित्रपट कलाकारांचे घर टिपता येते.वांद्रे-वरळी सी लिंकच्या खाली असलेल्या छोट्या खडकांवर तुम्ही रोमँटिक फोटोशूट करू शकता. वरळी सी लिंक सुद्धा चित्रात कैद झाल्यामुळे बहुतेक जोडपी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी येतात तिथे शेजारी एक छोटीशी बाग आहे.

तसेच प्री-वेडिंग फोटोशूटसाठी मुंबईतील या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

मरीन ड्राइव्ह, मुंबईचे गेटवे, ताज पॅलेस, वसईचा किल्ला किंवा वांद्रे-वरळी सी लिंकच नाही तर इतर अनेक ठिकाणे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहेत. जुहू बीच, मुंबई बसस्टँड, इमॅजिका थीम पार्क, हँगिंग गार्डन, एशियाटिक लायब्ररी, काला घोडा, सेंट्रल पार्क आणि बॅलार्ड इस्टेट सारखी ठिकाणे देखील प्रेमाची साक्षीदार होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT