Petrol Diesel Todays Price Updates  Saam Tv
लाईफस्टाईल

महागाईचा भडका! पेट्रोल- डिझेल 80 पैशांनी महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव...

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशामध्ये इंधन भाववाढ सुरु आहे. आज पेट्रोल- डिझेलच्या भावात ८० पैशांनी वाढ होणार आहे. २२ मार्चपासून देशामध्ये इंधन भाववाढ सुरु आहे. यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल १०१.१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९२.२७ रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. गेल्या ९ दिवसात ही आठवी इंधन भाववाढ आहे. रोज वाढणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या भावामुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महागाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन भाववाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात (market) कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव हे १०८ डॉलर प्रति बॅरलवर येऊन पोहचले आहेत. तरी देखील भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) भावात वाढ होत आहे. (Petrol Diesel Todays Price Updates)

हे देखील पहा-

पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर (government) टीकास्त्र सोडले आहे. वाढत्या इंधनाच्या भावावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये इंधन भाववाढीवर मौन सोडले आहे. इंधनाच्या वाढते भाव आपल्यासाठी एक चांगलेच आव्हान आहे. अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी सांगितले आहे की, २०१०-११ पासून २०२१-२२ पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारने ११.३७ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे भाव जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल- डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने बघता येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT