Handwriting  Saam Tv
लाईफस्टाईल

Personality : अक्षर सांगतात व्यक्तीचा स्वभाव; हस्ताक्षरातून असं ओळखा व्यक्तीचे व्यक्तिमत्व

Handwriting : ज्योतिष आणि मानसशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सहज निरीक्षण करण्यासाठी अनेक पद्धती वर्णन केल्या आहेत. हातावरील रेषा जसं भविष्य वर्तवत असतात, त्याचप्रमाणे व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्या व्यक्तीचे व्यक्तमत्व सांगत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Know Personality From Handwriting:

जेव्हा एखादी व्यक्ती कागदावर लिहिते तेव्हा त्याच्या हस्ताक्षरातील प्रत्येक अक्षर बोलत असते. ते पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी फक्त डोळ्यांची आवश्यकता असते. लेखनाची पद्धत, हस्ताक्षराचा वेग, अक्षरांची रचना, अक्षरांची जुळवाजुळव आणि अक्षरे जोडण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यास कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक क्षमतेसह त्याचे व्यक्तिमत्त्व काय असेल हे कळतं.(Latest News)

ज्योतिष आणि मानसशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सहज निरीक्षण करण्यासाठी अनेक पद्धती वर्णन केल्या आहेत. हातावरील रेषा जसं भविष्य वर्तवत असतात, त्याचप्रमाणे व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्या व्यक्तीचे व्यक्तमत्व सांगत असते. हस्ताक्षराचा अभ्यास करून, व्यक्तीच्या विचारसरणीची पातळी आणि त्याच्या सर्व गुण-दोषांचे काय असतील याचा अंदाज बांधता येतो.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • जर एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरातील प्रत्येक अक्षर सुवाच्य असेल तर ती व्यक्ती विचारपूर्वक लिहिते. चुका कमी करण्याचा प्रयत्न करते हे दिसून येते.

  • जर हस्ताक्षराचे बिंदू तीक्ष्ण असतील तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती स्वतःचं ऐकणारी आहे. कोणालाही त्याच्यासमोर बोलू देत नाही.

  • सरळ हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचा स्वभाव शांत आणि गंभीर असतो. कालांतराने अशा लोकांचे बरेचसे निर्णय योग्य ठरतात.

हस्तलेखन तीन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, उत्तम हस्ताक्षर, सरासरी हस्ताक्षर, मोठे हस्ताक्षर.

  • लहान अक्षरात हस्ताक्षर हे दर्शवते की व्यक्तीची तर्कशक्ती मजबूत आहे.

  • सरासरी हस्ताक्षर असलेल्या लोकांची विचारसरणी संतुलित असते.

  • तर मोठे हस्ताक्षर असलेल्या लोकांचे शब्द आणि कृतीमध्ये फरक असतो.

जर हस्तलेखनाचा खालचा भाग वाढला असेल तर ती व्यक्ती भौतिकवादी आणि खर्चिक व्यक्ती आहे ज्याला आराम आवडतो. अक्षर जर लांब लिहीत असेल तर ती व्यक्ती दुसरा कोणाचा विचार करत नाही. हस्ताक्षरातील सर्व चिन्हे योग्य ठिकाणी असतील तर त्या व्यक्तीचे हृदय शुद्ध असते. जो माणूस अक्षरे दाबतो आणि जड हाताने लिहितो तो अनेकदा संशयास्पद स्वभावाचा असतो.

जर एखादी व्यक्ती लिहिताना अक्षरे दूर अंतरावर लिहित असेल तर एखादी व्यक्ती आपल्या भावना कोणाकडेही सहजपणे व्यक्त करत नाही. तर गोंधळलेल्या व्यक्तीचे हस्ताक्षर नेहमी गोंधळलेले आणि अस्पष्ट असते. लिहिताना शब्द आणि ओळींमधील अंतर समान असेल तर व्यक्तीचे वर्तन संतुलित आहे हे समजावं. जर अक्षरे आणि रेषा अगदी जवळ असतील तर व्यक्तीला काम करण्याची घाई असते, हे त्यातून स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

SCROLL FOR NEXT