Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, मुलांच्या प्रश्नांनी भंडावून सोडले आहे ? मग अशी द्या उत्तरे

लहान मुलांचे प्रश्न ऐकून अनेक पालक चिडचिड करतात. त्यांच्यावरती रागावतात आणि त्यांना ओरडून गप्प बसायला सांगतात.

कोमल दामुद्रे

Parenting Tips : लहानपणी अनेक मुले काही गोष्टींना घेऊन गोंधळलेले असतात. अशावेळी ती पालकांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. लहान मुलांचे प्रश्न ऐकून अनेक पालक चिडचिड करतात. त्यांच्यावरती रागावतात आणि त्यांना ओरडून गप्प बसायला सांगतात.

जर तुमची मुलं सुद्धा तुम्हाला वाकडेतिकडे प्रश्न विचारत असतील. त्याचबरोबर तुम्हाला राग न येता शांतपणे उत्तर द्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

लहान मुलांची प्रश्न नक्कीच विचित्र असतात. परंतु सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या मुलांची आईक्यू लेवल वाढत जाते. अशातच पालक जेव्हा मुलांना (Child) ओरडतात आणि रागवतात तेव्हा मुलांचे प्रश्न विचारणे बंद होऊन जाते. त्याचबरोबर त्यांच्यामधील कॉन्फिडन्स लेवल सुद्धा कमी होतो. अशातच लहान मुलांच्या अर्थ नसलेल्या प्रश्नांना स्मार्टपणे उत्तर देणे हे पालकांसाठी (Parents) एक डिफिकल्ट टास्क होऊन जातो. जाणून घेऊया लहान मुलांना उत्तर देण्याच्या काही खास पद्धती.

1. प्रश्नांमध्ये आवड दाखवा :

लहान मुलांसमोर त्यांच्या प्रश्नांना बिन कामाचा प्रश्न समजू नका. त्यांना असं वाटलं पाहिजे की आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालक उतावळे झाले आहेत. तुम्ही जर असं केलं नाही तर तुमच्या मुलांचे मनोबल कमजोर होऊ लागले. अशावेळी मुलांच्या प्रश्नांना पूर्ण इंटरेस्ट घेऊन ऐका आणि शक्य असेल तर त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अशातच लहान मुलांच्या प्रश्नांना ओरडू नका आणि त्यांना मारू नका.

2. नवीन गोष्टींशी संपर्क करून द्यावा :

लहान मुलांसाठी अनेक गोष्टी नवीन असतात. अशावेळी लहान मुले प्रत्येक गोष्टीला जास्त एक्साईटमेंट सोबत पाहतात. अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नवीन नवीन गोष्टी सांगून त्याचे अनेक प्रश्न सोडवू शकतात. असं केल्याने मुलं प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अचूक असतील आणि कमी वयातच स्मार्ट बनतील.

Parenting Tips

3. उदाहरणाची मदत घ्या :

काही मुलांना कितीही समजावलं तरी गोष्टी कळत नाहीत. अशावेळी लहान मुले प्रश्नांचा भडीमार सुरू ठेवतात आणि शेवटी पालक त्यांना ओरडून शांत बसवतात. अशावेळी तुम्ही लहान मुलांना समजवण्यासाठी उदाहरणाची मदत घेऊ शकता. असं केल्याने लहान मुलांना गोष्टी लवकर समजून येतील. त्याचबरोबर दीर्घकाळ गोष्टी लक्षात राहतील.

4. इंटरनेटवर उत्तरे शोधा :

लहान मुलांच्या विचित्र प्रश्नांची उत्तरे पालकांजवळ सुद्धा नसतात. यावेळी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. इंटरनेटवर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती (Information) अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. इंटरनेटची मदत घ्या. त्याचबरोबर इंटरनेटवर तुम्हाला हवी असलेली माहिती जास्त प्रमाणात उपलब्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT