Optical Illusion for Personality Test
Optical Illusion for Personality Test Viral optical illusion
लाईफस्टाईल

Optical illusion: चित्रात दडलेला प्राणी सांगेल आपण अंतर्मुख आहोत की, बहिर्मुख

कोमल दामुद्रे

Optical illusion : ऑप्टिकल इल्युजन हे एखाद्या वस्तूचे किंवा चित्राचे स्वरूप आहे जे भिन्न असते आणि ते वेगळ्या प्रकारे समजले जाऊ शकते. सध्या सोशल मिडियावर नवनवीन ऑप्टिकल इल्युजन आपल्याला पाहायला मिळतात.

हे देखील पहा -

भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक भ्रम यांसारखे अनेक प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहेत. हे ऑप्टिकल भ्रम कधीकधी आपल्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्यात देखील मदत करतात. अनेक ऑप्टिकल भ्रम हे आपल्या व्यक्तिमत्त्वात लपलेले अनेक पैलूची ओळख करुन देते. ब्राइट साइडने शेअर केलेल्या वाइल्ड ऑप्टिकल इल्युजनमध्ये असेच एक उत्तम उदाहरण पाहिले जाऊ शकते. ज्यामध्ये आपलेल्या चित्रात लपलेल्या प्राण्यावरुन आपला स्वभाव कळेल.

या चित्रात ऑप्टिकल चाचणीनुसार आपल्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेण्यासाठी YouTube चॅनेल ब्राइट साइडने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये दोन झेब्राचे चेहरे आणि आडव्या खडबडीत रेषांमध्ये लपलेला सिंह आहे.

या ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपल्याला प्रथम कोणता प्राणी दिसला?

या ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपण पाहिलेला पहिला प्राणी (Animals) आपले व्यक्तिमत्त्व हे सामाजिक व शांत स्वरुपाचे दर्शवेल. काहींना या चित्रात दोन झेब्रा फिरताना दिसतील आणि काहींना सिंहाचे डोके ओळखता येईल.

आपल्याला या ऑप्टिकल इल्युजनमध्ये दोन झेब्रा दिसले असतील तर याचा अर्थ आपण बहिर्मुख आहोत. आपल्याला लोकांसोबत आणि इतरांच्या सहवासात राहणे अधिक आवडते. आपण लोकांशी गप्पा मारण्यात किंवा त्याच्या बद्दल जाणून घेण्यास अधिक उत्सुक असतो. ब्राइट साइड व्हिडीओनुसार, आपल्याला बोलायला आवडते आणि लोकांच्या आसपास राहण्यात मजा येते. नवीन ओळखी बनवणे हा आपला छंद आहे.

आपल्याला ऑप्टिकल इल्युजनमध्ये दिसणारी पहिली प्रतिमा खडबडीत मानेसह सिंहाचा चेहरा असेल, तर याचा अर्थ आपण अंतर्मुख आणि शांत व्यक्ती आहोत. स्वत:च्या आजूबाजूला लोकांची गर्दी करण्यापेक्षा आपण काही निवडक लोकांमध्ये राहण्यास अधिक पसंत करतो. ब्राइट साइड व्हिडिओनुसार, आपण शांत जीवनशैलीला प्राधान्य देता. आपण आपल्या काही विश्वासू मित्र (Friends) आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करता.

आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन नेहमी काही आकर्षक अंतर्दृष्टी देतात. रंग, प्रकाश आणि नमुने यांचे विशिष्ट संयोजन आपल्या मेंदूला कार्यरित ठेवते.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News : ८४ वर्षांचे आजोबा तिसऱ्यांदा अडकले लग्नबंधनात; आजीबाईचाही आनंद गगनात मावेना

GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा दारूण पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम; बेंगळुरूला धक्का

Mumbai News: मुंबई एअरपोर्टवरून ७.४४ कोटी रुपयांचं सोनं जप्त, ७ जणांना अटक

PM Modi Interview: इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे, यंदा 2019 चा रेकॉर्ड मोडणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai North West: कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT