Oppo Find N3 Flip Saam Tv
लाईफस्टाईल

Oppo Find N3 Flip : Samsung ला तगडी टक्कर देणार नवा फ्लिप फोन, लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

कोमल दामुद्रे

Oppo Find N3 Flip Features:

सॅमसंग आणि मोटोरोलानंतर काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फोल्डेबल फोन लॉन्च करणारी तिसरी कंपनी बनली आहे. अशातच या फोनची भारतात धमाकेदार एंट्री होणार आहे.

OPPO आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याचे ठरवले आहे. कंपनीने Oppo Find N3 Flip टीझर लॉन्च केला आहे. चीनी स्मार्टफोन निर्मात्याने यापूर्वी ट्विटवर Oppo Find N3 फ्लिपचा टीझर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

OPPO ने गेल्या महिन्यात चीनमध्ये Oppo Find N3 स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि आता ते लवकरच भारतात लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. याचे स्पेसिफेकेशन्स चायना व्हेरियंटसारखेच असतील.

1. Oppo Find N3 Flip चे स्पेसिफिकेशन (Specification)

Oppo Find N3 Flip मध्ये 1080x2520 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश दर देते. या फ्लिप फोन 382x720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 3.26-इंचाच्या डिस्प्लेसह येतो.

स्क्रीनला स्क्रॅच येऊ नये यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसच्या मदतीने बनवण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9200 चिपसेट आहे. हा फोन 12GB रॅमसह 256GB आणि 512GB स्टोरेजमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

2. Oppo Find N3 फ्लिपची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये Hasselblad द्वारे समर्थित ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. मागच्या साइडच्या कॅमेरामध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 48MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि f/2.0 अपर्चरसह 32MP टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहेत. समोर 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा आहे. यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh बॅटरीने दिली आहे. ओप्पोचा हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 5G सपोर्टसह येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT