walking yandex
लाईफस्टाईल

रिकाम्या पोटी की जेवल्यानंतर? वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी चालणं योग्य?

Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे चालणे. जलद वजन कमी करण्यासाठी आणि फास्ट फूड आहाराच्या युगात चालणे ही सवय आश्चर्यकारक ठरू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल प्रत्येकाला फीट आणि फाईन दिसायचं असतं. अशावेळी चालणं हे वजन कमी करण्यासाठीचा उत्तम मार्ग मानला जातो. पण सर्वांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी चालावं उत्तम की जेवणानंतर?

यापूर्वी केलेल्या अभ्यानुसार, असं समोर आलंय की, दररोज पायी चालणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जामा न्यूरोलॉजी आणि जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, किमान 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे.

संशोधनानुसार दररोज 10,000 पावलं चालल्याने हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

याशिवाय संशोधनातून असंही समोर आलं आहे की, पायी चालण्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहतं. जे लोक दररोज 75 मिनिटं चालतात ते नैराश्याचा धोका 18% पर्यंत कमी करू शकतात. जामा सायकॅट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 150 मिनिटांच्या शारीरिक हालचालींमुळे नैराश्याच्या 9 पैकी 1 प्रकरणांना प्रतिबंधित केलं जाऊ शकतं.

रिकाम्या पोटी चालण्याचे फायदे

चयापचय वाढते

रात्रीच्या जेवणानंतर सकाळी उठून चालल्याने पचनशक्ती वाढते. यामध्ये तुमचे शरीर आवश्यक पोषक तत्वांचा प्रभावीपणे वापर करून वजन कमी करण्यास मदत करते.

चरबी कमी होण्यास मदत

नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, रिकाम्यापोटी चालल्याने सुमारे 70% चरबी बर्न होते. त्याचप्रमाणे चयापचय क्रिय सुधारण्यास मगत होते.

जेवणानंतर चालण्याचे फायदे

हृदयरोगाचा कमी धोका

चालल्याने रक्तदाब कमी होतो त्यामुळे हृदयरोगासोबतच इतर आजारांपासून देखील मुक्ती मिळण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रण

मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी चालणं फायदेशीर आहे. जेवणानंतर इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

अॅसिडिटी

जर तुम्हाला नियमितपणे पोट फुगणं आणि अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामुळे पचनक्रिया सुधारतं आणि अॅसिडीटीसारख्या आजारांचा त्रास कमी होऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT