Instagram New Feature
Instagram New Feature Saam Tv
लाईफस्टाईल

Instagram New Reel Feature : आता इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे झाले आणखीन मजेशीर, रील्स करताना वापरता येणार हे फीचर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Instagram Update : Instagram हे Meta चे लोकप्रिय प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी वापरले जाते. अशातच Instagram ने वापरकर्त्यांसाठी एक नवे फीचर्स लॉन्च केले आहे. अॅपचा वापर अजून चांगला होण्यासाठी Instagram ने GIF चे नवे फीचर्स जोडले आहे.

पोस्ट्सवर कमेंट करणे आणि रील बनवणे आता मजेशीर होणार

कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी पोस्टवर (Post) कमेंट करण्यासाठी आणि रील तयार करण्यासाठी GIF फीचर जोडले आहे. म्हणजेच आता यूजर्स पोस्टवर कमेंट करण्यासाठी GIF वापरू शकतात. याच्या मदतीने आता रील्स बनवतानाही GIF वापरता येणार आहे.

भारतीय वापरकर्ते नवीन वैशिष्ट्य कधी वापरण्यास सक्षम असतील?

आतापर्यंत Meta चे लोकप्रिय Instagram अॅप हे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) शेअरिंग करण्यासाठी आहे आणि त्या पोस्टवर कमेंट (Comment) करण्यासाठी फक्त टेक्स्ट आणि इमोजी प्रदान करत होते.

कंपनीने काही वापरकर्त्यांसाठी आधीच GIF फीचर आणले होते, परंतु आता हे फीचर जागतिक स्तरावर आणले गेले आहे म्हणजेच आता सगळ्यांना उपलब्द करून दिले जाणार आहे. हे फीचर सध्या रोल आउट होत आहे, त्यामुळे भारतीय वापरकर्ते येत्या काही दिवसांतच नवीन फीचर वापरण्यास सक्षम असतील.

नवीन फीचर कसे वापरावे ?

नवीन फीचर वापरणे सोपे होणार आहे. एखाद्या पोस्टवर कमेंट करण्यासाठी, वापरकर्ता कमेंट बॉक्स जाऊन पोस्टवर कमेंट करताना, GIF बटणावर टॅप करून GIF टाकू शकतो. हे बटण कमेंट बॉक्सच्या उजव्या बाजूला दिले असेल.

आता तुम्ही बायोमध्ये पाच लिंक जोडू शकता

Instagram ने गेल्या महिन्यातच आपल्या वापरकर्त्यांसाठी प्रोफाइल बायोमध्ये पाच लिंक जोडण्याची सुविधा आणली होती.

वास्तविक, वापरकर्ते बर्याच काळापासून अशा फीचरची मागणी करत होते. त्याचबरोबर युजर्सची वाढती मागणी पाहून इंस्टाग्रामने युजर्सना ही सुविधा दिली. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या प्रोफाईल बायोमध्ये पूर्वीपेक्षा जास्त माहिती देऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT